नाशिक महानगर पालिकेचा "स्वच्छता ही सेवा" अंतर्गत "एक तारिख एक तास" विशेष उपक्रम संपन्न
नाशिक :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि १ ऑक्टो २०२३ रोजी संपूर्ण नाशिक शहरात स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत एक तारीख एक तास ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.सदर मोहीम शहरातील मनपाच्या सर्व ३१ प्रभाग व मनपाचे सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व शाळा अशा एकूण ६१ ठिकाणी राबविण्यात आली.वरील सर्व ६१ विविध ठिकाणी मनपा व सहभागी संस्था यांच्याकडून परिसराची स्वच्छता करण्यात येऊन जमा झालेला कचरा घंटागाडीद्वारे खतप्रकल्प येथे पाठविण्यात आला.या मोहिमेसाठी शहरातील नवीन नाशिक विभागातील प्रभाग २८ मध्ये आमदार सौ. सीमा हिरे उपस्थित होत्या.तसेच इतर विभागातही विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होतें. सदर मोहिमेस मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,मनपाचे उपायुक्त लक्ष्मीकांत सताळकर, डॉ विजयकुमार मुंडे,श्रीकांत पवार,प्रशांत पाटील,नितीन नेर,शहर अभियंता शिवकुमार वंजारी,घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ आवेश पलोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, शिक्षण अधिकारी बी टी पाटील,कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, सर्व विभागीय अधिकारी,आदींसह सर्व विभागप्रमुख,विभागीय स्वच्छता निरीक्षक, व मनपाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होतें.
सदर मोहिमेत मनपा समवेत विविध स्वयंसेवी,सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. रोटरी क्लब, पारिक सेवा संघ, रामकृष्ण मिशन,बँक ऑफ महाराष्ट्र, क्वालिटी सिटी नाशिक,NCC कॅडेट्स,विविध महाविद्यालयातील विद्यार्थी इंडियन ऑईलचे व ताज हॉटेलचे अधिकारी,कर्मचारी विविध खाजगी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक असे सर्व ११५०० च्या वर स्वयंसेवक सहभागी होते.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजन करून परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment