शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त संजय आनंदराव होळकर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त संजय आनंदराव होळकर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,सेवक संचालक चंद्रजित शिंदे, जगन्नाथ निंबाळकर,शिक्षणाधिकारी प्रा.डॉ.भास्करराव ढोके,जगदीश होळकर (अध्यक्ष अखिल भारतीय वायनरी असोसिएशन,नाशिक) ,रवींद्र नाईक (जिल्हा क्रीडा अधिकारी,जळगाव), अविनाश धुळे (जिल्हा क्रीडा अधिकारी,धुळे ) प्रकाश दायमा (संचालक नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक) साहेबराव पाटील( शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त )डॉ.मयूर ठाकरे ( क्रीडा संघटक,नंदुरबार) सुरेश पाटील (मनपा स्थायी समिती माजी अध्यक्ष) मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे,पर्यवेक्षक शिवाजी शिंदे,रंजना घंगाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे यांनी केले. आला.कार्यक्रमाप्रसंगी अनेक खेळाडूंनी आपले मनोगत यात बाळू केदारे तसेच रिद्धी सिंगवी यांनी होळकर सरांविषयी असणारा आपला आदरभाव व कृतज्ञता व्यक्त केली.तसेच विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका मंगला शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालय परिवारातर्फे सन्मानपत्र तयार करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन जेष्ठ शिक्षक सुनील कदम यांनी केले.
यानंतर विद्यालय परिवारातर्फे संजय होळकर यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. मान्यवर मनोगत रवींद्र नाईक,(जिल्हा क्रीडा अधिकारी,जळगाव) प्रकाश दायमा (संचालक नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक) तसेच जगदीश होळकर यांनी व्यक्त केले तसेच आप्तेष्ट मनोगत संजय होळकर यांची भावी सून सायली धारराव यांनी केले. यानंतर संजय होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मराठा हायस्कूल नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्था यांच्याविषयी असणारी कृतज्ञता व आदरभाव त्यांनी व्यक्त केला. तसेच आज आपण जे यश प्राप्त केले. त्यात आई-वडील कुटुंब हे देखील अत्यंत महत्त्वाचे होते असे त्यांनी नमूद केले तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्था हे देखील माझे कुटुंब आहे व या कुटुंबासाठी मी 33 वर्ष प्रामाणिकपणे काम केले असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.
Comments
Post a Comment