Posts

श्री क्षेत्र चौंडी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल – सभापती प्रा. राम शिंदे

Image
पुरातत्वीय जाणकार व संस्थांकडूनच विकास आराखड्यातील कामे ३१ मे, २०२८ पर्यंत पूर्ण केली जाणार अहिल्यानगर (चौंडी), दि. २९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजीच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित आहे. चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याने येत्या तीन वर्षात कामे पूर्ण होऊन श्रीक्षेत्र चौंडी एक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल, असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधून 06 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चौंडी (जि.अहिल्यानगर) येथे मंत्रिपरिषद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाने घेतलेले श्रीक्षेत्र चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड...

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
  उपमुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना दिलासा यावर्षीही वैद्यकीय सुविधा पुरवणार वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी मुंबई, दि. २९: आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देतांना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोग्य तपासणी ग...

हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती हिंदू एकता तर्फे साजरी

Image
नाशिक :- मेवाड रत्न, हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची 485 वी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने शहिद भगतसिंह चौक, द्वारका सर्कल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जेष्ठ शुद्ध तृतीया या हिंदू तिथीप्रमाणे सालाबादप्रमाणे महाराणा प्रताप जयंती शहर परिसरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येते.   याप्रसंगी प्रसिद्ध हृदय तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष गिरासे, व हिंदू एकता आंदोलन पक्ष तथा अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी संपूर्ण द्वारका परिसर महाराणाच्या आरतीने व जयघोषाने दुमदुमून गेला होता. या आनंद समयी उपस्थित सर्वांना पेढे भरवत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. हिंदू एकता व कातारी शिकलकर समाजाचे सुरेश पवार, प्रसाद बावरी, किरणसिंग पवार, प्रकाश खिची, मंगला पवार, विजय पवार, भारत सदभैया, विक्की राठोड, करणसिंग बावरी, अनिल जाधव, कृष्णा औटी, राजेंद्र समश...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अनमोल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
‘लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुंबई, दि. 28 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी कार्यातून राज्यकारभार केला. संपूर्ण देशभरात त्यांनी मंदिरांची पुननिर्मिती व घाटांची बांधणी केली, त्यांनी तयार केलेल्या विहिरी, तलाव यांचे संवर्धन करण्याचे काम राज्य शासन करणार आहे. त्यांचे कार्य अनमोल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त सोशल स्टडीज फाऊंडेशन निर्मित “लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम” या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती तथा ‘मॅट’च्या अध्यक्ष मृदुला भाटकर, कवी प्रसून जोशी, कॉफी टेबल बुकचे संपादक अम्बरिश मिश्रा, सत्यप्रकाश मिश्रा, अविनाश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.  मु...

न्यू मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

Image
नाशिक : न्यू मराठा हायस्कूलमध्ये एसएससी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रथम पाच व विशेष प्रावी ण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर नाशिक :-(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू मराठा हायस्कूलमध्ये एसएससी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम पाच व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार सोहळा मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती सदस्य के. डी. शिंदे, बिरारी, कल्पना माळोदे, जे. पी. पवार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, पुष्पा लांडगे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. परीक्षेस ३४१ विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये ९० % पेक्षा जास्त गुण मिळविणारे ८०, विशेष प्रावीण्य मिळविणारे २७०, प्रथम श्रेणीत ७०, तर व्दितीय श्रेणीत १४ विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील प्रथम विद्यार्थी कु. दिवीज दिनेश पाटील ९७.८०...

शिवगोरक्ष योगपिठात शनिवारी मोफत औषधोपचार शिबिर

Image
नाशिक :- पंचवटीतील अमृतधाम परिसरातील शिवगोरक्ष योगपिठात शनिवारी (दि.३१ मे) सकाळी १० ते ३ पर्यंत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ईसीजी, सांधेवात, त्वचारोग, डायबिटीस व सर्व प्रकारच्या रक्त तपासणी मोफत करण्यात येणार आहे. इतर सर्व आजारांची मोफत तपासणी करण्यात येऊन उपलब्ध औषधेही मोफत देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये डॉ. संतोष पांडे (मुंबई), डॉ. प्रवीण बुरम (मुंबई), डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. संतोष वैद्य, डॉ. कंचन सुथार हे तज्ञ तपासणी करणार आहे. या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवगोरक्ष योगपीठाचे परमहंस भगवान महाराज ठाकरे, महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क शिवानंद महाराज +91 88888 32294

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

Image
नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा मुंबई, दि. 27 :- राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठे, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी या...