हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती हिंदू एकता तर्फे साजरी

नाशिक :- मेवाड रत्न, हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची 485 वी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने शहिद भगतसिंह चौक, द्वारका सर्कल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जेष्ठ शुद्ध तृतीया या हिंदू तिथीप्रमाणे सालाबादप्रमाणे महाराणा प्रताप जयंती शहर परिसरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येते.
 
याप्रसंगी प्रसिद्ध हृदय तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष गिरासे, व हिंदू एकता आंदोलन पक्ष तथा अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी संपूर्ण द्वारका परिसर महाराणाच्या आरतीने व जयघोषाने दुमदुमून गेला होता. या आनंद समयी उपस्थित सर्वांना पेढे भरवत जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

हिंदू एकता व कातारी शिकलकर समाजाचे सुरेश पवार, प्रसाद बावरी, किरणसिंग पवार, प्रकाश खिची, मंगला पवार, विजय पवार, भारत सदभैया, विक्की राठोड, करणसिंग बावरी, अनिल जाधव, कृष्णा औटी, राजेंद्र समशेर, किशोर बागमार, नितीन खैरनार, प्रियंका अहिरराव, छानाबाई बावरी, स्वप्निल काथवटे, राजपूत समाजाचे जितेंद्र गिरासे, जयप्रकाश गिरासे, जयदीप राजपूत, जितेंद्र सिसोदिया, धर्मा साळुंखे, विरेंद्र टिळे, वाल्मिक राजपूत, जयदीप पवार, मिलिंद राजपूत, सुनील परदेशी, रत्नदीप सिसोदिया, जगतसिंह जाधव, नाना जाधव, छत्रपाल सिसोदिया, प्रेमसिंह राजपूत, बाळासाहेब मगर, जयपाल गिरासे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन