इंदिरानगर ला लोनारी समाज मेळावा उत्साहात संपन्न,महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती

मेळाव्यात पाचशे महिलांचा सहभाग


नाशिक इंदिरानगर -: लोणारी समाज महिला मेळाव्यात महिलांनी विविध गुणदर्शन pradarshn कार्यक्रम, स्वागत गीत, मनोरंजक खेळ, विविध क्षेत्रात धवल कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार आणि त्याला मिळणारा मोठा प्रतिसाद अशा उत्साही वातावरणात लोणारी समाज महिला स्नेहमेळावा इंदिरानगरच्या सुदर्शन लॉन्स येथे उत्साहात पार पडला.

लोणारी युवा संघातर्फे महिलांच्या कर्तृत्वाला आणि प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या 
महिला स्नेह मेळाव्याला सुमारे ५०० महिलांनी उपस्थिती लावली. लोणारी युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सवंत्सरकर,यांनी महिला स्नेहमेळावा चे अध्यक्ष पद स्वीकारले , उद्घाटक धुळे मनपाचे माजी नगरसेवक देविदास लोणारी, कोपरगाव पंचायत समिती सदस्य सुनीता सवंत्सरकर, पुष्पा लोणारी,सुरत , मोनिका ढोणे अहिल्या नगर , जगदीश बाबा कुऱ्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती. लोणारी युवा संघ स्थापन करण्याचे मुख्य कारण हे लोणारी युवा शक्ती एकत्रित करणे हे असून संघामध्ये महिला व पुरुष असे दोन्ही सदस्य म्हणून असतील असे संस्थापक अध्यक्ष विजय सवंत्सरकर,यांनी सांगितले , यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली. अन्वी गवांदे, हिने 'मी सावित्रीबाई' हा एकपात्री प्रयोग सादर केला. इस्त्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झालेल्या श्वेता कुऱ्हे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक,शासकीय सेवेत व खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सत्कार प्रसंगी करण्यात आला. लकी ड्रॉ, क्विझ स्पर्धा घेऊन बक्षिसे वाटप करण्यात आली .महिला समितीच्या निर्मला सवंत्सरकर, कल्याणी कुऱ्हे, प्रियांका कुऱ्हे, मिना सवंत्सरकर, ज्योत्स्ना कुऱ्हे , कविता सवंत्सरकर अर्चना खांडेकर ज्योती दादरे यांनी महिलांच्या कार्याबाबत माहिती दिली.चहा नाश्ता व जेवणाची उत्कृष्ट नियोजन संजय कुऱ्हे, यांनी केले.
कार्यकारणी पदाधिकारी , ललित संवत्सरकर, नवनाथ कुऱ्हे, आधारस्तंभ , संतोष दादरे, मार्गदर्शक,नीलेश ढोणे, गिरीश कुऱ्हे अध्यक्ष, मयुरेश कुऱ्हे,सूरज आढाव, अनिल इंगळे, उमेश लोणारी, सुनील सवंत्सरकर, ऋषी गोडसे ,शिवम कुऱ्हे,सुहास कुऱ्हे आदींनी संयोजन केले. प्रियांका इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष दादरे, यांनी आभार मानले.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन