अजय मराठे यांना जीवन संजीवन गौरव पुरस्कार




नाशिक - नुकताच १२ मे जागतिक परिचारिका दिवस साजरा होत झाला त्या निमित्ताने श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिक येथे परिचारिका दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

अजय मराठे यांनी आतापर्यंत २५ वेळेपेक्षा अधिक वेळा रक्तदान केल्याच्या निमित्ताने २५ वर्षपूर्ती म्हणून जनकल्याण ब्लड बँकेकडून अजय मराठे यांना जीवन संजीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्रातील संपूर्ण परिचारिका वर्गासाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. 

यावेळी अजय मराठे म्हणाले की जनकल्याण ब्लड बँक कडून International Nurses Day निमित्त झालेला हा माझा सन्मान हा माझ्या आतापर्यंतच्या सेवाभावाची व नर्सिंग क्षेत्रातील अतिशय योगदानाची पावती आहे.
जनकल्याण ब्लड बँककडून,माझा झालेला हा गौरव माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरेल अस म्हणायला वावगं ठरणार नाही.
तसेच "आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा क्षण आहे.
कारण हे फक्त रक्तदान नसून गेल्या कित्येक वर्षा पासून मी थेंब थेंब माणुसकी जपतोय. आणि त्याच ते योगदान आहे अस ते म्हणाले.


"रक्तदान हेच खरे जीवनदान...!"

या वेळी बोलताना म्हणाले की खरे बघायला गेले तर रक्तदान हे केवळ एक लहानसा त्याग आहे परंतु त्यातून कुणाच्या तरी कुटुंबातील प्रमुखाचे संपूर्ण आयुष्याला नवंसंजीवनी मिळते हे मात्र नक्की.

आणि मी गेली 25 वर्षापासून रक्तदान करत असताना ही वाट माझ्यासाठी पाहिजे तितकी सोपी नव्हती ..कारण प्रत्येक वेळेला मला एका अनोख्या समाधानाची अनुभूती मला मिळत गेली आणि मी उस्फुर्त पणे दरवर्षी रक्तदान करत गेलो.

सेवा ही माझ्यासाठी एक कर्तव्य नसून तीच माझी ओळख आहे. अन् ती माझी जबाबदारी आहे अस मी नेहमी मानतो.

खरे तर रक्तदान करून आपले काही हरवत नाही,परंतु कुणीतरी किंवा कोणतातरी रुग्ण यातून सर्व काही आयुष्याच अनमोल क्षण तो व्यक्ती जिंकू शकतो.

खरे तर हा मिळालेला सन्मान,मान्यता ही माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबासाठी मिळालेली समाजाची एक आगळी वेगळी सलामी आहे.

"रक्तदान हे जीवनदान आहे – आणि सेवा हे जीवनाचे खरे सौंदर्य आहे!"

रक्तदान केल्यावर ते रक्त जेव्हा कुणाला वापरले जाते तेव्हा तुम्ही मात्र कुणाला ओळखत नाही परंतु कुणीतरी तुमच्यासाठी आजन्म ऋणी होतो हे मात्र नक्की.

25 वर्षाची संकल्प पूर्वीचा गौरव करून जनकल्याण ब्लड बँक आणि माझ्या नर्सिंग क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांचे, ज्यांच्या सोबतीने हे प्रवास अजून समृद्ध झाला आहे त्यांचे सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून खूप खूप आभार..!
असे प्रतिपादन अजय मराठे, यांनी या वेळी केले.

या वेळी जनकल्याण ब्लड बँकेचे डॉ संजय कुलकर्णी, डॉ.दमयंती देव,सौरभ बावनकुळे,सारंग रत्नपारखी,चेतन निकम, श्री साईबाबा हॉस्पिटल च्या डायरेक्टर डॉ पल्लवी धर्माधिकारी, डॉ शिवानी साबळे, सर्व हॉस्पिटल प्रशासन अधिकारी, सर्व नर्सिंग इन्चार्ज व सर्व नर्सिंग ऑफिसर्स उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला