नाशिक मनपाने इंदिरानगर परिसरातील अतिक्रमण हटविले
नाशिक इंदिरानगर :- आज दिनांक 26 मे 2025 रोजी मनपा आयुक्त खत्री मॅडम अतिरिक्त आयुक्त झगडे मॅडम सन्माननीय उपायुक्त अतिक्रमण गायकवाड मॅडम विभागीय अधिकारी, राजाराम जाधव नाशिक पूर्व विभागीय अधिकारी, चंदन घुगे, नाशिक पश्चिम यांच्या आदेशान्वये पूर्व व पश्चिम विभागाच्या अतिक्रमण पथकामार्फत राजीव नगर झोपडपट्टी नजीक जुने इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या बाजूला अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून बसलेल्या मिसळ दुकानाचे अतिक्रमण पान टपरी कटिंग सलून चे दुकान आणि भंगार व्यवसायिकाची पत्र्याची शेड निष्कासित करण्यात आली याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे गुणवंत वाघ, लिपिक जीवन ठाकरे,व पथक समन्वयक तसेच नाशिक पूर्व व पश्चिम विभागाचे अतिक्रमण पथक कारवाई प्रसंगी उपस्थित होते.
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे
Comments
Post a Comment