आयईपीएफए आणि सेबी गुंतवणूकदारांना सक्षम बनवण्यासाठी तसेच तक्रार निवारण आणि दावा न केलेले लाभांश दावे सुव्यवस्थित करण्यासाठी पुण्यात पथदर्शी ‘निवेशक शिबिर’ सुरू करणार


निवेशक शिबिर गुंतवणूकदार, कंपन्या आणि आरटीए यांच्यात थेट संवाद घडवून आणून मध्यस्थांना दूर ठेवेल , समर्पित कियॉस्कद्वारे त्वरित तक्रार निवारण सुविधा प्रदान करेल

आयईपीएफए सहा ते सात वर्षांपासून दावा न केलेल्या लाभांशाची थेट वसुली सुलभ करेल
नवी दिल्ली, 29 मे 2025 केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने (आयईपीएफए) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) च्या सहकार्याने 'निवेशक (गुंतवणूकदार) शिबिर' या त्यांच्या पथदर्शी उपक्रमाची घोषणा केली आहे. पहिले शिबीर 1, जून 2025 रोजी पुणे येथे सकाळी 10:00 ते सायंकाळी 4:00 या वेळेत होईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांचे दावा न केलेले लाभांश आणि समभाग संबंधित समस्या सोडवण्यासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करणे आणि गुंतवणूकदार सेवांमध्ये थेट प्रवेश प्रदान करणे हा आहे.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आयईपीएफएचे खालील सुविधा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे :

सहा ते सात वर्षांपासून दावा न केलेल्या लाभांशांसाठी थेट सुविधा
केवायसी आणि नामांकनाचे तात्काळ अद्यतन
प्रलंबित IEPFA दाव्याच्या समस्यांचे निराकरण 
निवेशक शिबिरचा उद्देश गुंतवणूकदार, कंपन्या आणि रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (RTA) यांच्यात थेट संवाद घडवून आणून मध्यस्थांना दूर ठेवणे हा आहे, तसेच गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्याची यंत्रणा पुरवणे देखील आहे. मोठ्या संख्येने दावा न केलेली लाभांश खाती असलेल्या भागधारक कंपन्यांना या कार्यक्रमात समर्पित किओस्कद्वारे (kiosks) सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल.

पुण्यातील हा पथदर्शी प्रकल्प अशा शहरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या मालिकेतील पहिला प्रकल्प असेल जिथे दावा ना सांगितलेल्या गुंतवणुकीचे प्रमाण जास्त आहे. या संपर्क कार्यक्रमातून सुरक्षित, पारदर्शक आणि गुंतवणूकदार-केंद्रित आर्थिक परिसंस्था निर्माण करण्याप्रति आयईपीएफएची वचनबद्धता दिसून येते. पहिले प्रायोगिक शिबीर सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत लेमन ट्री, सिटी सेंटर, 15 आणि 15ए, कॅनॉट रोड, मोदी कॉलनी, पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित केले जाईल.

आयईपीएफए बद्दल

आयईपीएफए अर्थात गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण शैक्षणिक उपक्रम आणि धोरणात्मक सहकार्याद्वारे भारतात गुंतवणूकदार जागरूकता आणि संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे

इच्छुक दावेदार खालील लिंक वापरून या उपक्रमासाठी नोंदणी करू शकतात:

नोंदणी लिंक

अधिक माहितीसाठी, www.iepf.gov.in ला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला