अक्कलकोट पालखी व पादुका परिक्रमेचे रविवार दि. ११ रोजी चेतनानगर येथे आगमन
नाशिक इंदिरानगर :- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट पालखी व पादुका परिक्रमेचे रविवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजता कैवल्य अपार्टमेंट, इच्छापूर्ती चौक,चेतनानगर, राणेनगर येथे आगमन होणार आहे.
राणेनगर ते कैवल्य अपार्टमेंट येथे सकाळी १० आगमन व पालखी मिरवणूक त्यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती होऊन दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल,सायंकाळी श्रीक्षेत्र दत्तधाम नाशिक येथील प.पू.श्री दत्तदास महाराज यांचे आगमन त्यानंतर पाच ते सात वाजेपर्यंत कीर्तन व भजनाचा कार्यक्रम रात्री आठ वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. स्वामी भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विनोद पुरुषोत्तम कुलकर्णी, या सेवेकर्यांनी यांनी केले आहे.तसेच सदर पालखी दि.12.रोजी इंदिरा नगर महिला बँकेजवळ माजी नगरसेविका नागरे,यांचे कडे सकाळी 10 वाजता तेथून पुढे मुंबई नाका भाभा नगर येथे कुक्कर, यांचे निवासस्थानी आगमन होणार आहे. त्याठिकाणी दुपारच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment