छगन भुजबळांचे मंत्रीमंडळात कमबॅक घेतली राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष
नाशिक,दि.२० मे :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशे वाजवून, फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालय व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय मुंबई नाका येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले, प्रदेश पदाधिकारी गोरख बोडके, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्षा कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे,युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, संजय खैरनार,पूजा आहेर, आशा भंदुरे,संतोष भुजबळ,नाना पवार, रवि हिरवे, अमोल नाईक संकेत निमसे, चिन्मय गाडे, नाना साबळे, समाधान तिवंडे,निर्मला सावंत, व्यंकटेश जाधव, बाळासाहेब काठे, कुलदीप जेजुरकर, रुपाली पठाडे, विनोद डोके, ज्ञानेश्वर महाजन,अनिल नळे, संतोष पुंड, नाना नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment