अजय मराठे यांना ‘महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार
नाशिक :- सामाजिक क्षेत्रात,आरोग्यसेवा, परिचर्या व्यवसायात उतुंग असे नेतृत्व, निरंतर समाजसेवा,ग्रामीण सशक्तीकरण, महिला आरोग्य आणि युवाशक्तीला दिशा देणारे कार्य या सर्व क्षेत्रात आपला उत्कृष्ट असा ठसा उमटवणारे नाशिकचे श्री. अजय केशरबाई भास्कर मराठे यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे पुणे येथील समिन्स सभागृह, पत्रकार भवन येथे शेकडो मान्यवर, सेवाभावी कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांमध्ये
प्रसिद्ध अभिनेत्री पुष्पा चौधरी
प्रसिद्ध अभिनेत्री फाल्गुनी झेंडे
प्रख्यात समाजसेवक डॉ. संजीव टाकसाळे
युवा महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक गणेश वीरकर,
उद्योजक राजेश शिंदे,
शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक डॉ अजय कुलकर्णी,
ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिलिंद बाविसकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अजय मराठे यांचे २५ वर्षांहून अधिक काळ समाजासाठी प्राणपणाने झोकून देणारे प्रखर नेतृत्व.
मूळचे वेल्हाणे गावचे रहिवासी, आणि गेली २५ वर्षे नाशिकमध्ये स्थायिक असलेले श्री. अजय मराठे हे श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, नाशिक येथे नर्सिंग सुपरिटेंडेंट पदावर कार्यरत आहेत.
अजय मराठे हे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड चे विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.त्यांनी मराठा सेवा संघाच्या आणि संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत समाज सेवा पुरविली.
अनेक समाजहित , व महाराष्ट्रातील थोर महान पुरुषांचा इतिहास गावोगावी प्रबोधन करण्याचे काम देखील केले.जेव्हा जेव्हा महापुरुषांची बदनामी झाली तेव्हा तेव्हा ते प्रत्येक आंदोलनात सहभागी असायचे.
शिवस्वराज्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा क्षेत्रात आणि वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात आपला एक आगळा वेगळा ठसा त्यांनी उमटविला.
त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पूर्णवेळ सहभाग नोंदवला.
त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये ३०० पेक्षा अधिक मोफत आरोग्य शिबिरे राबवली असून, १५००+ गरजू रुग्णांना सवलतीत उपचार व औषधोपचार मिळवून दिले आहेत.
कोविड काळात देखील कोविड योद्धा म्हणून सामाजिक ऋण फेडले
कोविड महामारीच्या काळात त्यांनी स्वतः कोविड वॉर्डमध्ये दिवसाचे १२-१४ तास सेवा देत संघर्ष केला.
तेव्हा त्यांनी १०० हून अधिक नर्सेसची स्वयंसेवी टीम तयार करून ऑक्सिजन, बेड, औषधे आणि मानसिक आधार या स्वरूपात हजारो कुटुंबांना मदत केली.
वेळोवेळी राज्यातील नर्सेस च्या हक्कांसाठी प्रखर लढा दिला.
१०० हून अधिक नर्सेसच्या येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढत आलेल्या तक्रारींवर प्रशासन दरबारी योग्य तो सातत्याने पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय लावले.
कर्नाटक राज्यात शासनस्तरावर अनेक विद्यार्थ्यांची अडकलेली कागदपत्रे काढून आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर केल्या.
अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांचे रखडलेले पगार नियमित करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून ते पगार नियमित केले.
अनेक खासगी रुग्णालयांमध्ये परिचारिकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात वेळोवेळी आवाज उठवत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.
त्यांनी आतापर्यंत 25 वेळेपेक्षा अधिक वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श रुजू घातला त्याची दखल जनकल्याण ब्लड बँकेने घेऊन त्यांना नुकताच जीवन संजीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला.
राज्यातील नर्सिंग समुदायाच्या हक्क व प्रतिष्ठेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
युवाशक्ती, महिला सक्षमीकरण आणि समाज उभारणी साठी नेहमी तत्पर
२०००+ युवकांना आरोग्य व टेक्निकल क्षेत्रात मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करून दिलेत
१५+ रोजगार मेळावे आणि करिअर गाईडन्स सत्रांचे आयोजन करून नवयुवकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या
५००+ गरजूंसाठी २४x७ रक्तदात्यांचे नेटवर्क
‘एक गाव एक आरोग्यदूत’ उपक्रम, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहिमा
महिलांसाठी आरोग्य जागृती व ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ कार्यशाळा
संस्थात्मक भूमिका व सामाजिक नेतृत्व
संस्थापक अध्यक्ष – शिवस्वराज्य युवा फाउंडेशन
अध्यक्ष – युनायटेड नर्सेस असोसिएशन, उत्तर महाराष्ट्र
अध्यक्ष – नेहरू युवा मंडळ, शंभूराजे मित्रमंडळ, शंभूराजे जन्मोत्सव समिती
संस्थापक अध्यक्ष – नर्सिंग ऑफिसर्स ग्रुप
संस्थापक उपाध्यक्ष - नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य
उपजिल्हाध्यक्ष – मराठा इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशन
जिल्हाध्यक्ष – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण संघटन
समन्वयक – शिवराज्याभिषेक सोहळा रायगड, मराठा क्रांती मोर्चा, परिचर्या समन्वय समिती
संस्थापक अध्यक्ष – शिवतेज ग्रुप, महाराष्ट्र राज्य
आत्तापर्यंत अजय मराठे यांना 30 पेक्षा अधिक गौरव प्राप्त आहेत त्यापैकी
जीवन संजीवन गौरव पुरस्कार
उत्कृष्ट परिचारिका गौरव पुरस्कार
कोविड योद्धा सन्मानपत्र
मराठा समाज भूषण पुरस्कार
नर्सिंग, आरोग्यसेवा व सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
निष्कर्ष
अजय मराठे हे आरोग्य सेवा, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचे साक्षात प्रतिक आहेत.
त्यांनी आपल्या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतिक,क्रीडा क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट अशी कामगिरी कायम ठेवली. त्यांच्या कार्यामुळे हजारो जीवनांना दिशा मिळाली असून, ‘महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार’ हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि सेवाभावाचा अधिकृत सन्मान आहे.
ते एक आदर्श आरोग्यदूत, नेतृत्वक्षम समाजसेवक आणि तरुणाईसाठी प्रेरणास्रोत आहेत.
पुरस्कार स्वीकारते वेळी अजय मराठे म्हणाले की “महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार” मिळाल्याचा अत्यंत अभिमान वाटतो.
“महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार” हा युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मान नुकताच श्री. अजय केशरबाई भास्कर मराठे यांना प्रदान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ते आरोग्य सेवा, नर्सिंग नेतृत्व, ग्रामीण भागातील आरोग्य जनजागृती, युवक व महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत अत्यंत समर्पितपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
मराठे यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण कार्यसंघाचा, संस्थेचा आणि माझ्या कुटुंबाचा आहे. हा सन्मान मला अधिक प्रेरणा देतो, समाजासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची नवी उर्मी देतो.”
“माझ्या सेवाकाळात वैद्यकीय क्षेत्रात सेवा देताना, समाजातील वंचित, गरजू, ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा नेहमीच प्रयत्न केला. नर्सिंग शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करत, अनेक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी दिल्या. शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य जनजागृती उपक्रम, आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर काउन्सेलिंगचे आयोजन केले. सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नाट्य, वक्तृत्व, महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतून लोकांमध्ये सजगता निर्माण केली. तसेच, क्रीडा क्षेत्रात युवकांना प्रोत्साहन देत स्थानिक स्पर्धांचे आयोजन आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. ही सर्व कामगिरी मी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या भावनेतून केली आहे.असे प्रतिपादन अजय मराठे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
प्रसिद्ध अभिनेत्री पुष्पा चौधरी
प्रसिद्ध अभिनेत्री फाल्गुनी झेंडे
प्रख्यात समाजसेवक डॉ. संजीव टाकसाळे
युवा महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक गणेश वीरकर,
उद्योजक राजेश शिंदे,
शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक डॉ अजय कुलकर्णी,
ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिलिंद बाविसकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment