समाजसेवक डॉ अनिल धनगर यांचा समर्थ फाउंडेशन पुणे याच्या वतीने गगनभरारी पुरस्काराने सन्मान
पुणे :- नंदुरबार जिल्ह्यातील बोरद येथे वैद्यकीय सेवा देणारे समाज सेवक डॉक्टर श्री अनिल धनगर यांना नुकताच समर्थ फाउंडेशन पुणे याच्या वतीने गगनभरारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर अनिल हे अतिशय बिकट परस्थिती चा सामना करत उभे राहिलेले व्यक्तीमत्व आहे.
त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील टेकवाडे या गावात जन्म झाला आहे. आई वडीलांनी हालाखीची परिस्थितीत मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण केले आहे.डाॅ.अनिल धनगर हेही सुट्टी च्या दिवशी मजुरी करुन शाळेचा खर्च भागविण्यासाठी काम करत असत आई वडिलांचे स्वप्न होते मुलगा डॉक्टर झाला पाहिजे ते पुर्ण झाले असुन डॉ अनिल धनगर यांनी बी ए एम एस करुन वैद्यकीय सेवा नंदुरबार जिल्ह्यातील बोरद या गावी सुरु केली आहे. बोरद येथे ते स्थायिक झाले. डॉ अनिल धनगर व्यवसाय संभाळुन नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. गेली २५ वर्ष आदिवासी भागात सामाजिक कार्य करत आहेत. गोरगरीब विध्यार्थांना शालेय साहित्य उपलब्ध करून देत गरीब रुग्णाना अल्प दरात सेवा देणे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत सहभागी होत असतात.
डॉक्टर अनिल धनगर हे सेवाभावी संस्थांमध्ये ही कार्यरत आहेत मानव अधिकार संरक्षण समिती जिल्हा नंदुरबार तसेच
अखिल भारतीय धनगर समाज संघटना जिल्हा अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक ठिकाणी त्यांना पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रबोधन युवा शक्ती पुणे
यशवंत सेना अहिल्यानगर या संस्थेंचे देखील त्यांना पुरस्कार मिळाले आहेत
डॉक्टर अनिल धनगर हे आगळवेगळ व्यक्तीमत्व असुन त्याच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा.
आरुणदादा शिरोळे
Comments
Post a Comment