किमान 10 वर्षांची ग्राह्य सेवा केलेल्या केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त एनपीएस सदस्यांना एकीकृत पेन्शन योजने (यूपीएस) अंतर्गत अतिरिक्त लाभासाठी दावा करण्याची मुभा


यूपीएसअंतर्गत मिळणारे लाभ आधी दावा केलेल्या एनपीएसच्या फायद्यांव्यतिरिक्त असतील
 

दिल्ली: 30 मे 2025 केंद्र सरकारच्या एमपीएसचे जे सदस्य 31/03/2025 रोजी किंवा त्यापूर्वी किमान 10 वर्षांच्या लाभास पात्र सेवा कालावधीनंतर निवृत्त झाले असतील किंवा त्यांच्या कायद्याने विवाहित जोडीदाराला एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) अंतर्गत, एनपीएस अंतर्गत आधीच दावा केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त आणि त्याहून अधिक लाभांसाठी दावा करता येईल:

लाभासाठी ग्राह्य मानला जाणारा सेवा कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक सहा महिन्यांसाठी निवृत्त होण्यावेळच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या एक दशांश रक्कम आणि त्यावरील महागाई भत्ता एकरकमी (एकाच हप्त्यात) मिळू शकेल.

मासिक टॉप-अप रकमेचा हिशोब स्वीकार्य युपीएस पेआउट + डीअरनेस रिलीफ (DR) वजा NPS अंतर्गत मिळणारी प्रातिनिधिक वार्षिक रक्कम असा केला जातो

लागू असलेल्या पीपीएफ दरांनुसार सरळ व्याजासह थकबाकी.

यूपीएसच्या लाभांसाठी पुढील मार्गांनी दावा केला जाऊ शकतो:

भौतिक पद्धत - DDO ला भेट देऊन आणि अर्ज सादर करून (B2- सदस्यांसाठी आणि B4/B6 - कायदेशीररित्या विवाह केलेल्या जोडीदारासाठी). अर्ज पुढील लिंक वरून डाउनलोड करता येईल- www.npscra.nsdl.co.in/ups.php

ऑनलाइन पद्धत- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी www.npscra.nsdl.co.in/ups.php ला भेट द्या.

लाभांसाठी दावा दाखल करण्याची अंतिम मुदत: 30 जून 2025.

अधिक माहितीसाठी: @ https://www.pfrda.org.in/index1.cshtml?lsid=546 वेबिनारमध्ये सहभागी व्हावे.

यूपीएस मदत कक्ष (टोल फ्री) क्रमांक -18005712930

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन