स्वामी समर्थ पालखी मिरवणूक,भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नाशिक इंदिरानगर :- श्री स्वामी समर्थ, जय जय
स्वामी समर्थच्या गजरात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुका परिक्रमाचे राणेनगर चौफुली येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले भाविकांची दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.पादुकांची परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र मंडळ येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमाचे रविवारी (दि.११) सकाळी साडेदहा वाजता राणेनगर चौफुली लगत राणी लक्ष्मीबाई बचत गटाच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.स्वामी समर्थ पादुकांचे औक्षण पूजन वैशाली दळवी,विनोद दळवी यांनी केले.भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.या वेळी किरण उमाळे,राधा घोरपडे,दीपा तुरे,महेश चव्हाण,कौस्तुभ दळवी, यांच्यासह भाविक उपस्थित होते.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयघोषात ढोल-ताशाच्या गजरात राणेनगरमार्गे, चेतनानगर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या ट्रॅक्टरवरश्रींची मुकुट असलेली पालखी व बैलगाडी,तसेच टाळ मृदंगाच्या तालावर नाचणारे भजनी मंडळ. मिरवणूकवर भावीकांनी पुष्पवर्षाव करीत पालखीचे स्वागत केले. चेतनानगरच्या कैवल्य अपार्टमेंट येथे विनोद कुलकर्णी व पुरुषोत्तम कुलकर्णी बंधू यांच्या निवासस्थानी पालखी मुक्काम होता.दुपारी बारा वाजता महाआरती, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी श्रीक्षेत्र दत्तधाम नाशिक येथील प.पू.श्री दत्तदास महाराज यांचे आगमन झाले त्यानंतर पाच ते सात वाजेपर्यंत कीर्तन व भजनाचा कार्यक्रम होऊन आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी स्वामी भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला भाविकांचे स्वागत विनोद कुलकर्णी व पुरुषोत्तम कुलकर्णी या सेवेकर्‍यांनी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन