लग्नातील अवाजवी खर्चाला देऊ फाटा - ॲड. नितीन ठाकरे

लग्नातील अवाजवी खर्चाला देऊ फाटा- ॲड. नितीन ठाकरे
हुंदापद्ध्ती विरोधात विविध सामाजिक संघटनांची वज्रमुठ
नाशिक :- महाराष्ट्राला हेलावून टाकणाऱ्या महिन्याभरातील हुंडाबळीच्या घटनांमुळे समाजातील या दुष्ट चालीरीती आणी त्यावरील उपायांबाबत विचारमंथन करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, मराठा महासंघ नाशिक शाखा, यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिक तसेच विविध सामाजिक संघटनांतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
परिषदेला संबोधित करतांना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्त्री विषयक सन्मानाच्या संस्कारातून हा महाराष्ट्र निर्माण झाला, आद्य समाजसुधारकांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या जाणीवेतून आणि कार्यातून महाराष्ट्र घडला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात थोर विभूतींनी आपल्या कार्यातून, हुंदापद्ध्ती, सतीप्रथा आणि यासारख्या वाईट चालीरीती ज्या त्याकाळातील समाजात परंपरा म्हणून स्वीकारलेल्या होत्या त्याविरुद्ध आयुष्यभर झिजून आजचा सुसंस्कृत म्हंटला जाणारा महाराष्ट्र आपल्या हाती ठेवला आहे. त्यांच्या अखंड त्याग आणि परिश्रमाने बहुआयामी चांगले परिवर्तन होत समस्त बहुजनवर्ग शिकला, सुशिक्षीत झाला. परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालीत अनेकविध क्षेत्रात सर्वच समाजांतील तरुण मुलेमुली प्रगती करतांना दिसत आहे. एका बाजूला ही प्रगती दिसते तर दुसऱ्या बाजूला सर्व समाजात विशेषतः मराठा समाजात एक सामाजिक दरी दिसते. गावाकडील अल्पभूधारक गरीब शेतकरी आणि गर्भश्रीमंत, नवश्रीमंत लोकांची परंतु दोघांतही एक गोष्टीची समानता दिसते ती म्हणजे ‘लग्नाबाबतीत भावकी, नातेवाईक आणि इतर चारचौघे काय म्हणतील?’ या खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीतून गेली कित्येक वर्षे अनेकजण प्रसंगी कर्ज काढून आत्यंतिक थाटामाटात लग्न समारंभ पार पाडतात. या एका प्रश्नापुढे त्यांना बाकी जीवनावश्यक प्रश्न गौण वाटतात. मुलांचे शिक्षण जितके वाढले, जितक्या चांगल्या नोकऱ्या मिळवल्या दुर्दैवाने सर्वच नाही परंतु अनेक जणांचे हुंड्याचे अक्षरशः रेट ठरलेले असतात. यातून प्रसंगी वधुपक्षास नाडले जाते, छळ केला जातो. गेल्या महिन्याभरात आपल्या या विवाहपद्धतीचे बळी ठरलेले प्रसंग आपण सर्वानी पाहिले. मराठा विद्या प्रसारक केवळ एक शिक्षणसंस्था नाही तर पुरोगामी विचारांचा वारसा आणि प्रेरणा घेऊन बहुजन समाजात शिक्षणातून संस्कार रुजवणाऱ्या आणि समाजातील अनिष्ट प्रथा आपल्या कार्यातून परिवर्तन घडविलेल्या कर्मवीरांच्या जिवनाचे संचित आहे आणि त्यामुळे की समाजासाठी घातक होऊ पाहणाऱ्या पद्धतींवर पुनर्विचार करण्याची आणि समाजासमोर मांडण्याची आमची जबाबदारी बनते. 
यावरील उपायांवर भाष्य करतांना ते पुढे म्हणाले की, शासन, कौटुंबिक न्यायालये, सामाजिक संस्था आपापल्या परीने या समस्यांवर उपाय आणि प्रयत्न करीत आहेत. विवाहपूर्व समुपदेशना सारखे उपक्रम या संस्था राबवितात. तरीही सहनशीलता हा स्थायीभाव असल्याने अनेक महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत सांगत नाही किवा वेळ निघून गेल्यावर सांगतात अशा प्रसंगात महिलांनी खंबीर होत दाद मागितली पाहिजे, पोलीस, महिला आयोग, न्यायालये हे आपल्या मदतीसाठी आहे. ज्याला आपण व्हिसल ब्लोअर म्हणतो त्या पद्धतीने महिलांनी आपल्या वरील अन्यायाबाबत अथवा त्यांच्या संबंधितांनी डोळ्यादेखत होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्वरित आवाज उठवला पाहिजे.समाज म्हणून आपल्याला साधेपणाचा स्वीकार करावा लागेल. लग्नातील थाटमाट, अवाजवी खर्च, हुंडा आणि त्याचे प्रकार आणि अशा अन्यायाला खतपाणी घालणाऱ्या पद्धती जाणीवपूर्वक बंद कराव्या लागतील. यात प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक स्तरातील व्यक्तींनी, समूहांनी, संघटनांनी एकत्र येत सामूहिक जबाबदारीतून या गोष्टींबाबत निर्णय घ्यावे लागतील. भविष्यात तरुण मुले, कुटुंब आणी सामाजिक स्वास्थ्य वाचवायचे असेल तर अजून उशीर न करता जबाबदारी घेऊन विवाहपद्धती आणि एकूणच विवाहसंस्था यात विधायक बदल करावे लागतील.
या प्रसंगी माजी प्राचार्य डॉ. हरिष आडके, कालीकादेवी ट्रस्ट संचालक केशव पाटील, मराठा महासंघातर्फे चंद्रकांत बनकर, मराठा उत्कर्ष विवाहसंस्थाचे अरुण पळसकर, मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक विजय पगार आदी. उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला