नाशिक :- रोटरी क्लब अॅाफ नाशिक रिव्हर साईड आणि कोठारी हाऊसिंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर गावाजवळ कोठारी हाऊसिंग कंपनीच्या आरंभ इलाईट इमारतीच्या रस्त्यालगत१७ बकुळ फुलांच्या झाडांची रोपण करण्यात आले. या प्रसंगी दादासाहेब देशमुख यांनी झाडे लावण्याचे महत्व विषद केले.भविष्यात रोटरी क्लब ॲाफ नाशिक रिव्हरसाईड कायमच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची कामे करतील असे आश्वासनही त्यांनी दिले. रोपे लावल्यानंतर त्यांची निगा राखण्याचे कार्यदेखील कोठारे बिल्डर्स करणार आहेत.
या प्रसंगी रोटरी क्लब ॲाफ नाशिक रिव्हर साईडच्या सचिव जयश्री बापट, खजिनदार मीनल पटवर्धन , राजेश पुसदकर, जनसंपर्क अधिकारी आरती कुलकर्णी, राजेंद्र पवार, मुकुंद पानसे , यतीन पटवर्धन कार्यक्रमास उपस्थित होते.
Comments
Post a Comment