शिवगोरक्ष योगपिठात शनिवारी मोफत औषधोपचार शिबिर
नाशिक :- पंचवटीतील अमृतधाम परिसरातील शिवगोरक्ष योगपिठात शनिवारी (दि.३१ मे) सकाळी १० ते ३ पर्यंत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ईसीजी, सांधेवात, त्वचारोग, डायबिटीस व सर्व प्रकारच्या रक्त तपासणी मोफत करण्यात येणार आहे. इतर सर्व आजारांची मोफत तपासणी करण्यात येऊन उपलब्ध औषधेही मोफत देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये डॉ. संतोष पांडे (मुंबई), डॉ. प्रवीण बुरम (मुंबई), डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. संतोष वैद्य, डॉ. कंचन सुथार हे तज्ञ तपासणी करणार आहे. या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवगोरक्ष योगपीठाचे परमहंस भगवान महाराज ठाकरे, महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क शिवानंद महाराज +91 88888 32294
Comments
Post a Comment