न्यू मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा


नाशिक : न्यू मराठा हायस्कूलमध्ये एसएससी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रथम पाच व विशेष प्रावी ण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर
नाशिक :-(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू मराठा हायस्कूलमध्ये एसएससी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम पाच व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार सोहळा मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती सदस्य के. डी. शिंदे, बिरारी, कल्पना माळोदे, जे. पी. पवार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, पुष्पा लांडगे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. परीक्षेस ३४१ विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये ९० % पेक्षा जास्त गुण मिळविणारे ८०, विशेष प्रावीण्य मिळविणारे २७०, प्रथम श्रेणीत ७०, तर व्दितीय श्रेणीत १४ विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील प्रथम विद्यार्थी कु. दिवीज दिनेश पाटील ९७.८०%, कु. अर्पिता तुषार पूरकर ९७.६०%, इशिता प्रवीण वाघ ९६.८०%, वेदश्री हर्षल ततार ९६.६०%, कोमल टिकाराम चौधरी ९६.६०%, प्रेरणा प्रदिप पाटील ९६.४०%, निधी वाल्मिक सोनवणे ९६.४०%, श्लोक संतोष गवळी ९६.४०%, सई रवींद्र गुंजाळ ९६.४०% या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून अॅड. नितीन ठाकरे यांनी शाळेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल शालेय समिती, विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. अंजली निकम यांनी सूत्रसंचालन केले. तर ज्ञानेश्वर कोतवाल यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला