मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिव्हिल मिलिटरी को-ऑर्डिनेशनची विशेष बैठक


मुंबई :-  सध्याच्या युद्धस्थितीत मुंबईसह राज्य सुरक्षित रहावे यासाठी तिन्ही सैन्यदलांना संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 
सिव्हिल मिलिटरी को-ऑर्डिनेशनच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.

यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय सैन्यदलाने केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केले. भारतीय सैन्यदलाच्या अतुलनीय शौर्यामुळे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे शक्य झाले आहे. सीमेवरील युद्ध थांबले असले तरीही धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि तिन्ही सैन्यदलांमध्ये योग्य समन्वय रहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निश्चित करण्यात आले. 

तसेच मुंबईतील सर्व महत्त्वाच्या इमारतींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे मॉक ड्रिल घेऊन सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. राज्याला असलेल्या ७२० किमी लांबीच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी बोटींना बारकोड देऊन त्यांचे मॉनिटरिंग करणे, तसेच लँडिंग पॉईंट्सवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात येणारी खोटी माहिती आणि आक्षेपार्ह पोस्ट यांवरही विशेष लक्ष ठेवून त्या पसरण्यापासून रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईचे आर्थिक राजधानी म्हणून असलेले महत्त्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त माहिती एकमेकांशी शेअर करून समन्वय राखण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. 

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वेस्टर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल पवन चढा, ऍडमिरल अनिल जग्गी, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार इकबालसिंह चहल, एअर व्हाईस ऍडमिरल रजत मोहन, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, आरबीआय, एनएसई, बीएसई, जेएनपीटी, बीपीटीचे प्रमुख आणि इतर विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला