कुटुंबासमवेत चर्चा करून त्यांना पुढील त्रास वाचविण्यासाठी इच्छापत्र करावे - अँड .भिडे

नाशिक इंदिरानगर :- असाध्य रोगामुळे पेशंटचा मृत्यु होणारच असतो परंतु. वैद्यकीय इच्छापत्र करुन आपल्यावर होणारा व्यर्थ खर्च थांबवू शकतो असे कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वसंत व्याख्यान मालेचे पहिले पुष्प तज्ञ विधीपती अविनाश भिडे यांनी गुंफले. . इंदिरानगर कृतर्थ भवन येथील व्याख्यानमालेत वैद्यकीय इच्छापत्र या विषयावर गुंफताना सागितले इच्छापत्र दोन प्रकारचे असतात मृत्युपत्र: मृत्युनंतर संपत्तीची विल्हेवाट कशी लावायची बद्दल केलेले किवा वैद्यकीय इच्छापत्र हयात असतांना Terminally ill patient 
मृत्युच्या छायेत असणाऱ्या व्यक्ति हे इच्छापत्र करुन एखादा रुग्ण असाध्य आजारातून बरे होणार नाही अशी परिस्थिती असते त्यावेळी तो वैद्यकीय इच्छापत्र करुन आपल्यावर होणारा व्यर्थ खर्च थांबवू शकतो सविस्तरपणे मार्गदर्शन केले.यावेळी
प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष वासुदेव पांडे यांनी केले.  
प्रदीप कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. 
उपस्थित आमच्या शंकांचे निरसन करताना वैद्यकीय इच्छापत्र केल्यानंतर त्याचा कोण गैरफायदा घेऊ शकत नाही, इच्छापत्र बदलता येते
ते डाॅक्टर,घर,स्थानिक प्रशासन,हाॅस्पीटल प्रवेश पत्र येथे ठेवता येते. वैद्यकीय इच्छापत्र करण्यासाठी वयाची अट नाही असे सांगितले. यावेळी संघाचे जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन