केटीएचएम महाविद्यालयाचा बारावीचा 87 टक्के निकाल
विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ टक्के
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८७ टक्के लागला असून, विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ टक्के कला शाखेचा ६९.८९ तर वाणिज्य शाखेचा ९१. ९३ टक्के लागला.
विज्ञान शाखेची रिया कैलास वाघ ही विद्यार्थिनी 85.83 टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वाणिज्य शाखेतून सार्थक राजेंद्र मांडगे हा विद्यार्थी 91 .17 टक्के मिळवून प्रथम तर कला शाखेतून सोहम बापूसाहेब साळुंके हा विद्यार्थी 91.67 टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. धनश्री विक्रम शिंदे या विद्यार्थिनीने अकाउंट विषयात तर, राजश्री ज्ञानेश्वर चव्हाण आणि सप्तमी संजय आंबेकर या दोन विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले.
सर्व शाखांमधील पहिल्या आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मविप्र पदाधिकारी व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सेवक संचालक डॉ संजय शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. के. एस. शिंदे, डॉ. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्यासह शाखाप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
शाखानिहाय पहिले पाच विद्यार्थी
विज्ञान- रिया कैलास वाघ (85.83), कृष्णा अरविंद पाटील (85.50), सिद्धांत अनिल सुरवाडे (85.17),अनिकेत बाळू शेळके (84.33), श्रावणी राजाराम संधान (84.00)
वाणिज्य- सार्थक राजेंद्र मांडगे (91.17), स्नेहा विठ्ठल शेरे (90.83), अजिजूर अब्दुररहमान शेख (90.50), अपूर्वा अमोल पवार (88.33), गौरी गणेश खराटे (87.33)
कला - सोहम बापूसाहेब साळुंके (91.67) मोहित अशोक पाटील( 88.16), आकाश भगवान गायकवाड(86) , वैशाली मोहन ससे(82.33), तनुजा विष्णू वाघ (77.83)
Comments
Post a Comment