जि प शाळा धोंगडेवाडी कृष्णनगर शालेय समिती कडून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य व मान्यवरांचा सत्कार
इगतपुरी :- जि.प. शाळा धोंगडेवाडी कृष्णनगर शालेय समिती अध्यक्ष सौ रेखा संतोष धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच इतर मान्यवरांचा सत्कार मुख्यध्यापक जाधव सर, सहकारी शिक्षक रेवगडे सर यांच्या अध्यक्षतेखाली खाली करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच वैशालीताई सचिन आंबावने, उपसरपंच गणेश धोंगडे, सदस्य अशोक जाधव, सदस्य अर्चना रामदास धोंगडे, सदस्य वाल्मीक तारडे, ग्रामसेवक भगवान गणेशकर, शिपाई भाऊराव तारडे, धनाजी राव, संतोष धोंगडे, मल्हारी धोंगडे, संजय धोंगडे रोहिदास धोंगडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी सत्कारमूर्ती यांनी आभार व्यक्त करत शाळेच्या सोयी सुविधा साठी पाहिजे ती मदत करण्यास कटिबध्द राहू असे आश्वासन दिले.