बुध्दीच्या बळावर जगले तर तुमची प्रगती होईल - प्रा.आनंद सावकारे


फोटो - शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी पहीले पुष्प गुंफतांना प्रा.आनंद सावकारे.याप्रसंगी व्यासपिठावर मविप्र संचालक रमेश पिंगळे,लक्ष्मण लांडगे,शिक्षणाधिकारी डाॅ.अशोकराव पिंगळे,अध्यक्ष निवृत्ती महाले,तानाजी पिंगळे,रामदास पिंगळे,चंद्रभान पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर.

मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्र व मविप्र शैक्षणिक संकुल मखमलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी प्रा.आनंद सावकारे हे बोलत होते.

कार्यक्रमास मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड,संचालक रमेश पिंगळे, संचालक लक्ष्मण लांडगे,शिक्षणाधिकारी डाॅ.अशोकराव पिंगळे,सेंट्रल गोदावरी संस्थेचे मा.चेअरमन तानाजी पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणुन तर अभिनव बाल विकास मंदिर स्कुल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शिवपुतळा,सरस्वतीपुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.शालेय गीतमंचाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.तीन दिवसीय व्याख्यानमालेमधील पहीले पुष्प गुंफणारे प्रा.आनंद सावकारे व त्यांच्या विषयासंदर्भात त्यांनी आपले विचार स्पष्ट केले.सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे स्वागत केले.समाजाचे अधःपतन टाळण्यासाठी चांगल्या मार्गाने जाणे आवश्यक आहे.चुकीच्या गोष्टी टाळुन चांगल्या गोष्टी अंगिकाराव्यात यामुळे विद्यार्थ्यांचा नैतिक विकास होतो.समाजातील सर्व चांगल्या विषयांना धरुन या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाप्रसंगी ज्योती बुक स्टोअर्सच्या लकी ड्राॅ स्पर्धेतील विजेत्या कु.तन्वी पगारे,कु.नीरज जाधव,कु.तन्मय पवार,कु.समृध्दी गाडेकर या चार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सायकल वाटप करण्यात आले.तसेच प्राचार्य संजय डेर्ले व अभिनवचे मुख्याध्यापक यांना भेटवस्तु देण्यात आली.ज्योती बुक स्टोअर्सचे संचालक वसंतराव खैरनार हे याप्रसंगी उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांना पुस्तके भेट देण्यात आली.व्याख्यात्यांचा परिचय जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केला.प्रा.आनंद सावकारे यांनी "सामाजिक प्रबोधनाचे अधःपतन" या विषयावर आपले विचार व्यक्त केले.त्यांनी श्रोत्यांची अवस्था बघुन ओघवती शैली व मनोरंजनात्मक पध्दतीने व्याख्यानास सुरुवात केली.मनाचा धर्म,मनाचे आचरण सर्वात महत्वाचे.वाईट विचार करणार्‍यांच्या मागे दुःख धावत येईल.महाराष्ट्र ही प्रबोधनकार व संतांची भूमी आहे.आपण आपली बुध्दी गहाण ठेवू नये,कुणाचेही ऐकु नये.शिक्षणातुन शहाणे व्हावे,भोंदु महाराजांच्या मागे धावणे कमी करावे.जगतगुरु संत तुकाराम महाराजांची महती आपल्या व्याख्यानातुन सांगितली.आजचे बाबा लोक बिदागीशिवाय तारीख देत नाही.याऊलट संत तुकारामांनी स्वतःची संपत्ती समाजाला दिली.आजमितीस संत तुकारामांना अवतार घेण्याची गरज आहे.अवतार नाही घेता आला तर त्यांचे विचार प्रसारित करण्याची गरज आहे.मनात मोठ्या आकांक्षा निर्माण होणे व प्रसन्नता निर्माण होणे.या भावनेने कार्य केले तर मन आनंदी होते.कामावर श्रध्दा ठेवल्याने देव प्राप्त होतो.शिक्षणाने समाज पुढे जातो.प्रगती विज्ञानाने होते,अज्ञानाने पुढे जाण्याची संधी आपण घालवून बसतो.त्यांनी विद्यार्थ्यांना मनाला ठाम करण्याचा निर्धार दिला तो असा.मी सत्याच्या मार्गाने चालणार,भोंदु बाबांच्या मागे जाणार नाही.आर्थिक हानी करणार नाही.तुम्ही बुध्दीच्या बळावर मार्गक्रमण करा.बुध्दीच्या बळावर जगले तर तुमची प्रगती होईल.निवृत्ती महाले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस मराठी अस्मिता जागृत करणारा आहेत.सामाजिक,राजकीय क्षेत्रात त्यांनी अहोरात्र काम करुन महाराष्ट्राची शान दिल्लीत राखुन ठेवण्याचे काम साहेबांनी केले आहे.त्यांचा आपण आदर्श घेतला पाहीजेत.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका वैशाली देवरे,प्रमिला शिंदे व संतोष उशीर यांनी केले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या सुरेल आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,चंद्रभान पिंगळे,पंढरीनाथ पिंगळे,नरेंद्र मुळाणे,प्राचार्य संजय डेर्ले,कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनंदा वाघ,अभिनवचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार,होरायझनच्या मुख्याध्यापिका सोनाली गायकर,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,प्राध्यापक सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन