शासकीय आयटीआय येवला येथे तंत्रप्रदर्शन संपन्न
येवला :- येवला-येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संस्था स्तरावर तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यात संस्थेतील एकूण २३ प्रोजेक्ट प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केले होते सदर तंत्रप्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे आय.एम.सी कमिटी सदस्य जी डी खैरनार,यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात विविध व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातील सर्वेयर व्यवसायाच्या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक ड्राफ्ट्समन सिव्हील व तिसरा क्रमांक इलेक्ट्रिशियन ट्रेड ला मिळाला निवड झालेल्या तीनही मॉडेलची जिल्हास्तरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथील प्रदर्शनात निवड करण्यात आली आहे.प्रोजेक्ट तयार करण्यासाठी शिल्प निदेशक गौरव भास्कर, निलेश घुगे,तसेच रवींद्र वाणी, संदीप चव्हाण, यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर प्रदर्शनाचे नियोजन गटनिदेशिक शितल धकराव, यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनिता शिरसाट, कैलास चौधरी,अविनाश देवरे,संदीप ठूबे, तुषार धात्रक, विनायक सस्कर, स्वप्निल शिवलेकर, करण सपकाळे, रेश्मा मुंडे, चुनियन शीलेलान, बर्वे व गायकवाड आदींनी परिश्रम घेतले सदर जिल्हास्तरीय प्रदर्शनात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुलकर्णी, तसेच आयएमसी सचिव व स्थानिक प्राचार्य आर एस राजपूत,यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment