महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबईतील शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा सिगारेट साठा जप्त
मुंबई :- तस्करी करून आयात केलेल्या 2.4 कोटी रुपयांच्या सिगारेटचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने एयर कार्गो संकुलात केला हस्तगत
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबईतील शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत बाजारात 2.4 कोटी रुपये मूल्य असलेल्या 15,86,960 सिगारेट्सचा साठा मुंबईच्या एयर कार्गो संकुलातून हस्तगत केला आहे. या संकुलात एका कंटेनरची अतिशय बारकाईने तपासणी केल्यावर कापड असलेल्या खणांच्या खोक्यांच्या आत अतिशय हुशारीने सिगारेटचे कार्टन्स लपवले असल्याचे आढळले.
तस्करी करून आयात केलेल्या या खोक्यांमध्ये सुमारे 2.4 कोटी रुपयांच्या 15,86,960 सिगारेट्स असल्याचे आढळले. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.
Comments
Post a Comment