वर्षा अखेरच्या संकष्टी चतुर्थी निमित्त नवश्या गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
नाशिक - वर्षाच्या अखेरची संकष्टी चतुर्थी असल्याने नवसाला पावणाऱ्या नवश्या गणपती येथे गणेश भक्तांनी पहाटे पासून मोठ्या प्रमाणावर रांगा लावून दर्शनाचा व नवस पूर्ती साठी घंटा अर्पण करून दर्शनाचा लाभ घेतला. गंगापूर रोड येथील प्रसिद्ध नवश्या गणपतीची पहाटे महापुजा अभिषेक,महाआरती ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव, संगीता जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.
गणपती बाप्पा मोरयाच्या जय जय कारात ट्रस्टच्या वतीने केळीचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला.चतुर्थी निमित्त अर्पण ब्लड बँक, नासिक ब्लड सेंटर,जीवन ब्लड बँक यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात उपस्थित असलेल्या बहुसंख्य गणेश भक्तांनी स्वयंस्पूर्तीने रक्तदान केले.चंद्रोदयाच्या वेळी महाआरती करून मोदकाचा प्रसाद वाटप करण्यात आला.रात्री उशिरापर्यंत गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.परिसरात विविध खाद्यांची प्रसादांची दुकाने लागल्याने जत्रेचे स्वरूप आले होते.
Comments
Post a Comment