महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन


नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव भागातील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून भरभक्कम भरपाई द्या तसेच पिक विमा कंपन्यांचे निकष बदलून शेतकऱ्यांना न्याय द्या.!

नाशिक :- गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी. मागील दोन ते तीन दिवस नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाल्याने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच हलाखीत असलेला शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. एका बाजूला शेती फुलावी यासाठी देवाची आराधना करणाऱ्या बळीराजाला हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी व गारांच्या पावसामुळे तयार झालेले भात, द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, कापूस, मका, टोमॅटो, ऊस इ. या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली पिकं अक्षरशः झोपली आहेत. पुढील तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडत राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जोरदार वारा आणि तुफानी गारांचा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कापणीला आलेली पिके आडवे पडल्याचे दिसून येत आहे. हजारो शेतकऱ्यांचे तयार झालेले द्राक्षाचे भात तसेच कांदा पीक देखील संकटात सापडले असून बागायतदारांची वर्षभराची मेहनत एका तडाख्यात नष्ट झाली आहे. पुढील दोन वर्ष बळीराजा उभा राहणार नाही, इतके नुकसान शेतीचे झालेले आहे. त्यामुळे माय बाप सरकारने या शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवून भरभक्कम नुकसान भरपाई देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नाशिक,धुळे,नंदुरबार, जळगाव प्रत्येक जिल्हा प्रशासनाने अशा अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे. 
"बी बियाणे, औषधे, मजूर यांवर भरमसाठ खर्च करून तयार झालेली पिके पूर्णतः नष्ट झाल्यामुळे शेतकरी मानसिक व आर्थिक दृष्ट्या कमजोर झाला आहे. अशा मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असून प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे तर एकूण नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. मालातील दर घसरणीमुळे आधीच बळीराजा मेटाकुटीला आलेला असताना आता या अस्मानी संकटांनीही बळीराजाच्या तोंडचा घास हिसकावण्याचे काम केले आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवाला धीर देणे ही राज्य सरकार व केंद्र सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे." महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी व प्रशासनाने एकूण परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तातडीने पारित करावेत अशी  विनंती करण्यात आली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या संतप्त शेतकऱ्यांच्या संतापातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही सरकारवर राहील.निवेदन देण्या साठी मनसे रस्ते,आस्थापना चे प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील नाशिक महानगर संघटक विजय आहिरे,नाशिक जिल्हा संघटक अभिजीत गोसावी,अमित गांगुर्डे,नंदुरबार जिल्हा संघटक अनिल पाटील,जळगाव जिल्हा संघटक भाईदास बोरसे आदींसह पदधिकारी  मनसे सैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन