रामलीला मैदानावर अश्वमेध महायज्ञ स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
त्रंबकेश्वर :- सिंहस्थाच्या कमिटीत साधुसंतांनाही स्थान द्या स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांची मागणी. रामलीला मैदानावर 10 फेब्रुवारीपासून होत असलेल्या अश्वमेध महायज्ञ संदर्भात दिली पत्रकार परिषदेत माहिती श्रीराम शक्ती पिठ बेझे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सोमेश्वरानंद सरस्वती यांनी अश्वमेध महायज्ञ नियोजन बाबत माहिती दिली
यावेळी सोमेश्वरानंद सरस्वती म्हणाले की सिंहस्थाच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीत साधुसंतांना स्थान नसने ही अतिशय खेदजनक बाब आहे, या समितीत प्रशासकीय अधिकार्यांबरोबर साधुसंतांनाही स्थान देण्यात यावे अशी आमची साधु महंतांची मागणी असून यासंबंधी शासन स्तरावर बोलणी करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय सनातन परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी तथा पीठाधीश्वर, श्रीराम शक्तीपीठ संस्थान, राष्ट्रसंत अनंत विभुषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी दिली.
अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे 10 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ (108 कुण्डीय) संपन्न होणार आहे, सदर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज यांच्या त्र्यंबकरोडवरील बेजे येथील आश्रमात पत्रकार परिषद प्रसंगी ते बोलत होते.
स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, अश्वगतीने राष्ट्र निर्माण सुरु व्हावे तसेच सर्व भारतीय सनातन धर्मासोबत जोडले जावे या उद्देशाने अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे अखिल पंचायती अखाडा श्री निरंजनी, अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहन्त रविन्द्रपुरी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील साधु संत महंतांच्या उपस्थितीत अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ होणार आहे. हा महायज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी होणार असून यात सनातन धर्मातील सर्व जाती धर्माचे लाखो भाविक देश विदेशातून आहुती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अखिल भारतीय सनातन परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितले की, महायज्ञात गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे तसेच सनातन आयोगाची स्थापना करण्यात यावी या मागण्यांचा प्रस्ताव महायज्ञ प्रसंगी पारित करण्यात येणार आहे. महायज्ञात श्रीराम कथा, श्रीमदभागवत कथा तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महायज्ञात 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातर्फे एक दिवसीय हनुमान चालिसा पठण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
Comments
Post a Comment