मखमलाबाद ज्युनियर कॉलेज मुलांच्या हॉलीबॉल संघाची राष्ट्रीय स्तरावर निवड

फोटो = जुनियर कॉलेजच्या हॉलीबॉल संघाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना मविप्र संचालक रमेश पिंगळे,संचालक ॲड संदीप गुळवे, शिक्षणाधिकारी डाॅ.अशोकराव पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील ज्युनियर कॉलेजच्या हॉलीबॉल संघाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.युथ गेम्स कौन्सील महाराष्ट्र यांच्यातर्फे श्रीरामपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ज्युनियर काॅलेजच्या हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.या संघाची नेपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व यशस्वी खेळाडूंचे संचालक रमेश पिंगळे, संचालक अॅड.संदीप गुळवे, शिक्षणाधिकारी डॉ.अशोकराव पिंगळे, प्रा.डाॅ.प्रतिभा जाधव,ज्येष्ठ सभासद पांडुरंग पिंगळे,माजी नगरसेवक दामोधर मानकर,होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे, माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे, पंढरीनाथ पिंगळे,परसराम पिंगळे, गोरख तिडके,भास्कर तांबे,प्राचार्य संजय डेर्ले,प्राचार्या डाॅ.सुनंदा वाघ, उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,ज्युनियर काॅलेज प्रमुख उज्वला देशमुख,प्रा.विकास थोरात,प्राध्यापक,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.या सर्व खेळाडुंना क्रिडाशिक्षक एस.पी.डेर्ले यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन