मखमलाबाद विद्यालयात थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा

फोटो - थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य संजय डेर्ले, वर्गशिक्षिका प्रमिला शिंदे व सर्व ज्येष्ठ शिक्षक वृंद

मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक नितीन भामरे,अनिल पगार,संतोष उशीर, भाग्यशाली जाधव,संगीता मापारी, प्रमिला शिंदे,अनिता जाधव, बिज्वला कदम,उज्वला जाधव उपस्थित होते."गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" अशा आपल्या भजनातून ज्यांनी गावोगावी जाऊन कीर्तन भजने केली व माणुसकीचा संदेश दिला,देव दगडात नाही तर माणसात आहे असा मौल्यवान संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कु.श्लोक हुमेन याने त्यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.हातात झाडु व कटोरी घेऊन त्याने गाडगेबाबांच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांना साधी राहणी व उच्च विचारसरणी हे महत्त्व पटवून दिले. तसेच स्वच्छतेचा संदेश दिला. शाळा हे मंदिरासारखे आहे तिला आपण सर्वांनी स्वच्छ ठेवले पाहिजे असेही त्याने शेवटी सांगितले. वर्गशिक्षिका प्रमिला शिंदे यांनी "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे भजन अतिशय सुरेल आवाजात सादर केले कु आस्था चित्ते,कु.काव्या घाडगे,कु.अक्षदा ठमके,कु.देवयानी खैरनार,कु.स्वरा अहिरे यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे फलक सादर करून सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा मंत्र दिला. कु.ओवी गोसावी हिने सूत्रसंचालन केले.या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका प्रमिला शिंदे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी या उपक्रमातील विद्यार्थ्यांचे कौतुक करून आपली शाळा स्वच्छ कशी राहील याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन