मखमलाबाद विद्यालयात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
फोटो - महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमापूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,वर्गशिक्षिका संगिता मापारी व जेष्ठ शिक्षकवृंद
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा "महापरिनिर्वाण दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,जेष्ठ शिक्षक अनिल पगार,तुकाराम तांबे,वर्गशिक्षिका संगिता मापारी,प्रमिला शिंदे,वैशाली देवरे,उज्वला जाधव,बिज्वला कदम,सायली मोरे उपस्थित होते.कु.गौरी काकड,कु.अथर्व लहामटे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील महू या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते.त्यांना बालपणापासुन वाचनाची आवड होती.इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करुन ते बॅरीस्टर होऊन भारतात परतले.त्यांनी भारतात दलितांच्या उध्दाराचे महान कार्य केले.त्यांच्या या महान कार्यामुळेच त्यांना "महामानव" ही पदवी देण्यात आली.कु.श्लोक साळुंके याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा सादर करुन इंग्रजीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंच यांनी "उध्दरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे" हे गीत अतिशय सुरेल आवाजात सादर केले.आभार प्रदर्शन कु.अंजली काकड हिने तर सुत्रसंचालन कु.प्रांजल भामरे हिने केले.इ.५ वी ब च्या सहभागी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका संगिता मापारी यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment