पर्यटन संस्कृती कला मनोरंजन,प्रदर्शन आदींचा खजिना असलेल्या खान्देश महोत्सवास दि.२२ डिसेंबरला सुरुवात
नाशिक :- खान्देशी बांधव आतुरतेने वाट पाहत असलेला नाशिककरांचा लोकप्रिय खान्देश महोत्सवाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने आयोजन.नाशिक शहरातील खान्देशी बांधव तसेच नाशिककरांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण,असलेला खान्देश महोत्सव दिनांक २२,२३,२४, तसेच २५ डिसेंबर २०२३ ला
नाशिकच्या ठक्कर डोम एबीबी सर्कल, सिटी सेंटर माॅल याठिकाणी सुरुवात होत आहे.सदर महोत्सवात दि.२२ ला मराठी साहित्य अहिराणी कवी संमेलन खान्देशी बॅन्ड,कानबाई गाणे दि.२३ ला क्रांती नाना मळेगावकर न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा,दि.२४ रोजी महिला सांस्कृतिक नृत्य स्पर्धा फुल टू धमाल महाराष्ट्राची हास्य जत्रा,लावणी क्वीन माधुरी पवार यांचा लावणी कार्यक्रम तसेच खान्देश रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.सदर महोत्सवाचे आयोजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ आमदार सीमाताई हिरे, रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले आहे.नागरीकांनी खान्देश महोत्सव बाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.संपर्क - 9011067999/9822091143/8888818143/9881071253
Comments
Post a Comment