लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात चांदवड तालुक्यातील सरपंच उपसरपंच
चांदवड :- तक्रारदार पुरुष,वय-20 यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या कडे केलेल्या तक्रारीवरून चांदवड तालुक्यातील भास्कर पुंडलिक गांगुर्डे वय 55 वर्ष धंदा शेती व सरपंच, सोग्रस, रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा नाशिक.यांनी तसेच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे वय 45 वर्ष,धंदा शेती व उपसरपंच- सोग्रस,रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा- नाशिक यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी करत रुपये तडजोडी अंती ३० हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले.
लाच स्विकारली असता 30, हजार/ रुपये रक्कम एसीबीच्या पथकाने हस्तगत केली.
यातील हकीकत अशी की तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने भास्कर गांगुर्डे यांनी व प्रकाश गांगुर्डे यांनी सही करून पाठवण्यासाठी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रु ची लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रु ची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.सदरची साफळा कारवाई अधिकारी अनिल बडगुजर,पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक पो.ना. दिपक पवार. पो.शि. संजय ठाकरे यांनी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,याच्या मार्गदर्शनाखाली केली.
Comments
Post a Comment