नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबाबत सत्कार पारितोषिक देऊन गौरव
नाशिक :- महाराष्ट्रातील सैनिकांचे कल्याण व पुनर्वसन, शहीद सैनिक कुटुंबीयांना मदत याकामी नाशिक महानगरपालिकेने जिल्ह्यातून सर्वात जास्त (दहा लक्ष आठ हजार रुपये - प्रथम क्रमांकाने) ध्वज निधी संकलित केल्याबद्दल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक महानगरपालिकेच्या मनपा कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत प्रशंसा केली तसेच शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, प्रशस्ती पत्रक व पारितोषिक देऊन गौरव केला.
नाशिक महानगरपालिकेच्यावतीने लेखा विभागाचे उपलेखापाल सूर्यभान खोडे, रमेश उदावंत यांनी सत्कार स्वीकारला. या निधी संकलनात आयुक्त व मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाचा मोठा सहभाग असल्याने लेखा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सदरचे प्रशस्ती पत्रक व पारितोषिक आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
Comments
Post a Comment