मखमलाबाद विद्यालयात शहीद नाईक कोंडाजी दराडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त "शहीद सन्मान दिन" मोठ्या उत्साहात साजरा
शहिद नाईक कोंडाजी दराडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करतांना प्रा.डाॅ.जितेंद्र मगरे,विरपत्नी बकुबाई दराडे,आयोजक ज्ञानेश्वर काकड,प्राचार्य संजय डेर्ले व दराडे परिवारातील सदस्य
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे मखमलाबाद गावचे सुपुत्र वीरजवान शहीद नाईक कोंडाजी दराडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन प्राचार्य संजय डेर्ले तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.डाॅ.जितेंद्र मगरे हे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपिठावर कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काकड,वीरपत्नी बकुबाई दराडे,भाऊ कचरु भिकाजी दराडे,सखुबाई दराडे,कन्या पुष्पा आव्हाड,भारती विंचू,नातू सुधीर विंचू,माजी सैनिक सजन पिंगळे,प्रकाश पिंगळे,आबा तिडके,सुदर्शन काकड उपप्राचार्य राजेंद्र गाडे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमा,सरस्वतीपुजन व शहिद नाईक कोंडाजी दराडे यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काकड यांनी आपल्या मनोगतात शहीद नाईक कोंडाजी दराडे यांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली.१९७१ च्या भारत पाक युध्दात म्हणजे ५२ वर्षांपूर्वी याच दिवशी ४ डिसेंबरला त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांची वीरपत्नी व सर्व परिवार याठिकाणी उपस्थित असल्याचा त्यांनी परिचय करुन दिला.प्रमुख पाहुणे प्रा.डाॅ.जितेंद्र मगरे यांनी शहिदांना विनम्र अभिवादन करुन आपली सुरुवात केली.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना एन.डी.ए.ची तयारी कशी करावी याची सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी सैन्यभरतीसाठी कशाप्रकारे अभ्यास करावा,याचेही सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाप्रसंगी मविप्र शिवमहोत्सवात विश्वविक्रमी ग्रंथ रांगोळी काढल्याबद्दल कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे तसेच किल्ला बनविणारे विद्यार्थी व मार्गदर्शक जेष्ठ शिक्षिका संगिता मापारी,ज्योती काळोगे,अनुपमा पवार,अभिजीत न्याहारकर यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी तर सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका वैशाली देवरे,संतोष उशीर यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment