मखमलाबाद विद्यालयात साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

फोटो - साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करतांना उपप्राचार्य राजेंद्र गाडे,वर्गशिक्षिका बिज्वला कदम व जेष्ठ शिक्षकवृंद

मखमलाबाद :-  मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभहस्ते साने गुरुजींच्या प्रतीमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर बी.एड.काॅलेजचे प्राध्यापक,तसेच जेष्ठ शिक्षक नितीन भामरे,बाबासाहेब मुरकुटे,अनिल शेवाळे,संतोष उशीर,रंगनाथ संगमनेरे,नितीन जाधव,भाग्यशाली जाधव,संगिता मापारी,वर्गशिक्षिका बिज्वला कदम,अनिता जाधव,वैशाली देवरे,प्रमिला शिंदे,उज्वला जाधव व कार्यक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.कु.दुर्वा देशमुख हिने आपल्या मनोगतात साने गुरुजी यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली."खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे" ही शिकवण ज्यांनी जगाला दिली ते महान विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणजे साने गुरुजी होय.साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला.त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते.त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणीचा फार मोठा प्रभाव पडला होता.त्यातूनच त्यांचा जीवनाचा खरा विकास झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली.त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले व महत्व पटवून दिले.त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता.ते स्वतः खादीच्या कापडाचा वापर करत असे.१९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहुल स्वातंत्र्याचा प्रचार केला. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे या मागणीसाठी त्यांनी उपोषण केले. साने गुरुजी जसे थोर देशभक्त व समाज सुधारक होते तसेच ते एक उत्तम साहित्यिक पण होते.त्यांनी ७३ पुस्तके लिहीली.यामध्ये कथा, कादंबऱ्या,लेख,निबंध,चरित्र व कवितांचा समावेश आहे."श्यामची आई" ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिली आहे.अशा या थोर देशभक्त,मातृभक्त विद्यार्थी प्रिय शिक्षकाचे निधन ११ जून १९५० रोजी झाले.कु.श्रावणी काळे हिने साने गुरुजींच्या प्रसंगावर एक अतिशय उत्तम गोष्ट सांगितली.कु.अथर्व आव्हाड याने "मी साने गुरुजी बोलतोय" हे सुरेल गीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रज्ञा चांगले हिने केले.इयत्ता पाचवी ई च्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका बिज्वला कदम यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन