मखमलाबाद विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

फोटो - शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मविप्र संचालक रमेश पिंगळे,पहीलवान वाळू काकड,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,ई.आर.भुसारे,मुख्याध्यापक चंद्रकांत पवार,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,विज्ञान शिक्षक व सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांच्या शुभहस्ते चांद्रयानाचे प्रतिकात्मक प्रक्षेपण व विज्ञान प्रदर्शन फलकाबरोबर हवेत फुगे सोडून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर पहीलवान वाळू काकड,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,विज्ञान शिक्षक ई.आर.भुसारे,अभिनवचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार,राहुल काकड,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शिव पुतळा,सरस्वती पूजन व माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या शालेय गीत मंचाने ईशस्तवन,स्वागतगीत व विज्ञान गीत सादर केले प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.त्यांनी विज्ञान प्रदर्शनाचा हेतू स्पष्ट केला.विज्ञानाचे आजच्या युगातील महत्त्व सांगितले.अंधश्रद्धा बाजूला ठेवून विज्ञानाची कास धरणे तसेच भावी काळात आपल्या विद्यालयातील एखादा विद्यार्थी शास्त्रज्ञ होऊ शकतो हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांची नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते सर्व शालेय परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.मखमलाबादचे प्रतिष्ठित पहिलवान वाळू काकड यांची नाशिक तालुका शेतकी संघावर नवनियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.शालेय हँडबॉल स्पर्धेतील राज्यस्तरीय संघास मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देण्यात आले तसेच कुमारी पायल गावंडे हिची राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी दिल्ली येथे निवड झाल्याबद्दल पहिलवान वाळू काकड यांच्यातर्फे तिला २५००/- रुपयांचे बक्षिस देण्यात आले.भुसारे सर यांनी आपल्या मनोगतात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो.नवनिर्मितीची संकल्पना विद्यार्थ्यांना रुजते.या प्रदर्शनातून बालवैज्ञानिक तयार होतात व भावी काळातील प्रगती होत असते.गोदावरीतील पानवेली ही सामाजिक समस्या भविष्यात एखादा विद्यार्थी यावर उपाय शोधू शकतो असेही त्यांनी सांगितले.माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जग कशी वाटचाल करत आहे ते सांगितले. विज्ञानाने माणूस मोठा होतो. इस्रायलमध्ये लोक खडक फोडून त्या ठिकाणी शेती करतात. विज्ञानामुळे आर्थिक स्तर उंचावला आहे.एखाद्या गोष्टी मागचा कार्यकारण भाव शोधला पाहिजे. आंधळेपणाने अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नये.साचेबंद न जगता सृजनशीलता व नाविन्याची कास धरली पाहिजे,प्रयोग करुन निष्कर्ष काढले पाहीजेत.भुसारे सरांच्या खगोल शास्त्रज्ञ मुलाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन तसेच वैज्ञानिक रांगोळीचे प्रदर्शन इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ विज्ञान शिक्षक अनिल शेवाळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका रुपाली शिंदे यांनी केले. प्रदर्शनासाठी एन.सी.सी.आर्मी व एन.सी.सी.नेवल या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.त्यांना आर्मी ऑफिसर भास्कर भोर व नेवल ऑफिसर दयाराम मुठाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्रदर्शन यशस्वीतेसाठी जेष्ठ विज्ञान शिक्षक अनिल शेवाळे,प्रविण कारे,वर्षा पाटील,मोनाली कोकाटे,मनिषा पाटील,रुपाली शिंदे,रंगनाथ संगमनेरे,भाग्यश्री बागले,योगिता रोडे,कल्पना देशमाने,योगिता कासार,अनुपमा पवार,सुनिता घोटेकर,गितांजली घडवजे,अभिजीत न्याहारकर,सायली मोरे या सर्व विज्ञान शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन