आमदार बच्चू कडू यांचा मेंढपाळ बांधवांच्या वतीने नागरी सत्कार

चांदवड :- हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजातील मेंढपाळांच्या चराई क्षेत्र तसेच वनविभाग, घरकुल संदर्भात आमदार बच्चुभाऊ कडू यांनी लक्षवेधी मांडल्याने चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे कांदा व द्राक्ष परिषद मध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने मेंढपाळ बांधवांच्या वतीने आमदार बच्चुभाऊ कडू यांचा भव्य नागरी सत्कार काठी घोंगडी पागोटे देऊन करण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.अधिवेशनामध्ये समाजाबद्दल रोखठोक अशी कुठलीही भूमिका इतर कोणत्याही लोक प्रतिनिधींनी घेतली नाही याबाबत आमदार बच्चुभाऊ कडू यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. सत्कार समारंभ प्रसंगी  प्रहार चे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर प्रहार जिल्हा चिटणीस समाधान बागल,विनायक जी काळदाते, गोरख  गाढे, ज्ञानेश्वर ढेपले संदीप महाराज जाधव ज्ञानेश्वर वलगडे आनंदा जाधव, सोनवणे , सोपान सुडके,दत्ता साप्ते, आदींसह मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन