नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक :- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत केली आहे त्यावर आपण आपली भूमिका लवकर जाहीर करून या वाढविलेल्या निर्यात बंदी स्थगिती द्यावी कारण या कायद्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरु झाली आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवून नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात यावा. ३१ मार्च २०२४ नंतर कांदा निर्यात बंदी उठवली तर यामध्ये केवळ व्यापारी वर्गाचाच फायदा होतो, कारण कांदा साठवण्यासाठी पुरेशी साधन- सुविधाया सर्व सामान्य शेतकरी वर्गाकडे नसतेच. या गोष्टीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांकडून कमी भावाने व्यापारी कांदा खरेदी करून साठवून ठेवल्या जाणाऱ्या आस्थापना त्यांच्या कडे आहेत. परिणामी व्यापारी वर्गाचाच फायदा होतो. निर्यात बंदीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी बाजार समित्यांचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, दिंडोरी, येवला, बागलाण,नाशिक, नांदगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. निर्यात बंदी मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. काही ठिकाणी रास्ता रोको सारखी आंदोलने होत आहेत. व्यापारी संघटनेने तर बेमुदत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरेशा पाऊस न झाल्याने विकत पाणी आणून कांदा जगवला आहे. त्यात देखील नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकासह विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे रब्बी हंगाम पण धोक्यात आला आहे. परंतु दर नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यात बंदीला मुदतवाढ देण्याच्या पत्रकामुळे कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. अलिकडच्या काळात केंद्र शासनाचे दोन वेळा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. निर्यात बंदीचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटले आहेत. मात्र त्याची दखल केंद्र सरकारने अद्यापही घेतलेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. मत मागायला आमच्या घरी येतात. अन आश्वासने देऊन विसरून जातात. कांदा निर्यात बंदी हा जिल्ह्यातील अत्यंत गंभीर राजकीय विषय बनला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.अनेक ठिकाणी केंद्र व राज्य सरकार विरोधात आंदोलने होत आहेत. तरी किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळणेस विनंती केली आहे.निवेदन देते वेळी मनसेचे रस्ते,आस्थापना प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील महानगर संघटक विजय अहिरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment