कांदा निर्यात बंदी विरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन
नाशिक :- नाशिकच्या चांदवड तसेच देवळा सटाणा तालुक्यातील शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानी 'डेरा डालो'आंदोलन, तसेच कांदा निर्यात बंदी विरोधात भारती पवार यांच्या निवासस्थानी बाईक रॅली देखील काढण्यात आली होती,ही रॅली मोर्चा अशोक स्तंभ येथे पोलीसांच्या वतीने अडवण्यात आला.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यात या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी, कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी, या प्रमुख मागणीसाठी आज नाशिकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या निवासस्थानी प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारती पवार यांच्या नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली गेली.यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांना निवेदन देण्यात आले.निवेदन स्वीय सहायक यांनी स्वीकारले. प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी, अवकाळी गारपीट दुष्काळी तीनही अनुदान एकरकमी मिळावे, आदींसह मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या, यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, सुरेश उशीर, प्रकाश चव्हाण, हरिभाऊ सोनवणे,समाधान बागल, गणेश काकुळते, हरिभाऊ महाजन, श्याम गोसावी आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment