नाशिक महानगरपालिका क्षेत्रात भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ


नाशिक :- नाशिक महानगरपालिका क्षेत्रात भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे समन्वयक डॉ. विजयकुमार मुंडे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या शुभहस्ते नाशिकरोड पोलिस स्टेशन  येथे संपन्न झाला. 
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्रशासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना आयुष्यमान भारत योजना, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, भारतीय जन औषधी योजना, अटल पेन्शन योजना, आत्मनिर्भर भारताच्या विकासाचे दृष्टीने नव्या युगाची सुरुवात अशा विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व शिबिराचे आयोजन नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून दिनांक २८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान शहरातील विविध ६० ठिकाणी या यात्रेद्वारे आयोजन करण्यात आलेले आहे. नाशिकरोड येथील पोलीस स्टेशन जवळ यात्रेचा शुभारंभ विकसित भारत यात्रेच्या डायरीचे आणि कॅलेंडरचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ तानाजी चव्हाण,नाशिकरोड विभागाचे विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, डॉ. जितेंद्र धनेश्वर,पोलीस निरीक्षक रामदास शेळके,NULM अधिकारी पल्लवी वक्ते,रंजना शिंदे,समूह संघटकसोनी सोंसलळे,पल्लवी श्रीमाळी, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव,माजी नगरसेवक संभाजी मोरुजकर, संगिता गायकवाड, शरद मोरे,अंबादास पगारे, नाना शिलेदार,शांताराम घंटे,ज्ञानेश्वर पिंगळे सुनील आडके, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. आज या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी दृक्श्राव्य माध्यमाद्वारे यात्रेत सहभागी झलेल्या नागरिकांसमवेत सवांद साधला. ज्या लाभार्थ्यांनी शिबिरात भाग घेतला त्यांचे त्वरित आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड त्याचबरोबर विविध लाभार्थ्यांना त्यांचे परिचय कार्डाचे वाटप नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी हा देखील उपक्रम राबविण्यात आला.तसेच उपस्थित नागरिकांना संकल्प विकसित भारताची शपथ नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी दिली. ही भारत विकसित संकल्प यात्रा हे २८ डिसेंबर पर्यंत शहरातील३१ प्रभागात ६० ठिकाणी डिजिटल रथा द्वारे जाणार असून शिबिराचे आयोजन या ६० ठिकाणी होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन