करणी सेनेचे सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येचा नाशिक मध्ये निषेध, निवेदन देत आंदोलनाचा इशारा
नाशिक :- राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५ डिसेंबर रोजी जयपूर राजस्थान येथील त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याघटनेच्या निषेधार्थ नाशिकचे समस्त राजपूत समाजबांधवांनी सिडको येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले.
यावेळी राजपूत समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील जे कोणी हल्लेखोर व त्यामागील आहेत त्यांना अटक करुन खटला तातडीने फास्टट्रॅक वरती चालवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी उत्तर प्रदेश राज्यातील मुख्यमंत्री ज्या पद्धतीने निर्णय घेतात तसाही निर्णय तेथील सरकारने घेतला तर तो चालेल अन्यथा आम्हा क्षत्रिय बांधवांना रस्त्यावर उतरून अन्य मार्गाने न्याय मागणीसाठी सदनशीर मार्गाने आंदोलने करावे लागतील. यात आम्ही सर्व समाज बांधव परिवारासकट सामील आहोत याची खास करून दखल घ्यावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा आमचा मार्ग आम्हास मोकळा आहे.
यावेळी महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, हिंदू एकता आंदोलन पक्ष, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, महाराणा प्रताप उन्नती मंडळ, महाराणा प्रताप बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय कातारी शिकलकर समाज संघ, महाराणा प्रताप सेवा संघ, राजपूत बेलदार समाज, परदेशी राजपूत समाज, महाराणा युवा सेना, महाराणा उद्योजक लाॅबी, राणा की सेना यासर्व राजपूत संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment