Posts

दिपावली सुट्टीनिमित्त सिटीलिंक पास केंद्राच्या वेळेत बदल

Image
नाशिक :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. परिणामी शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्ट्या लागल्या आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने सध्यस्थितीत पास काढणार्‍या प्र्वाश्यांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे सण-उत्सव कालावधीकरिता पास केंद्राच्या वेळेत अंशतः बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेतच पास केंद्र सुरू राहतील मुख्य म्हणजे हा वेळेतील बदल केवळ दिनांक ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीकरीताच करण्यात आला आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ज्या ही प्रवाशांना पास काढावयाचा असेल अशा प्रवाशांनी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेतच काढून घ्यावा.  सद्यस्थितीत सिटीलिंक मुख्यालय, निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक या तीन ठिकाणी पास केंद्र सुरू असून या सर्व ठिकाणी हा निर्णय लागू असेल. तसेच दिनांक १९ नोव्हेंबर पासून पास केंद्र पूर्ववत सुरू राहातील याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी.

नवीन ऑन्कोलॉजी युनिट आणि रेडिओलॉजी उपकरणे, रुग्णासाठी वरदान - मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे

Image
नाशिक :- आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि मविप्र रुग्णालय आणि संशोधन केंद्रात कर्करोग निदान आणि उपचार कक्ष कार्यान्वित झाला असून त्यामुळे नाशिक शहर , जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे , जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा लाभ होणार . या कर्करोग निदान व उपचार कक्षात कॅन्सर सर्जन डॉ- सुलभ भामरे आणि कॅन्सर फिजिशियन डॉ- शैलेश बोंदार्डे हे रुग्णांना सेवा देणार आहेत. मविप्र रुग्णालयात नवीन डिजिटल एक्स-रे, डीआर सिस्टम आणि डिजिटल एक्स-रे स्कॅनोग्राम या अद्ययावत मशीन उपकरणाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. नवीन ऑन्कोलॉजी युनिट आणि नवीन रेडिओलॉजी उपकरणे हे सर्वसामान्य रुग्ण आणि  मविप्र सभासदांसाठी वरदान ठरतील. तसेच नवीन कर्करोग निदान व उपचार कक्ष जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा देणारे असून अद्ययावत उपचार प्रदान करण्यासाठी मविप्र व्यवस्थापनाने उचलेले हे महत्वपूर्ण पाऊल. यावेळी मविप्र, सरचिटणीस अँड नितीन ठाकरे शिक्षणाधिकारी डॉ- ज्ञानेश्वर लोखंडे , अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे , उप...

युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना

Image
युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना सक्षम बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना राबविल्या जातात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा अशा दोन वेगवेगळ्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि पारदर्शकपणे होत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी व्यावसायिक अथवा उद्योगासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर या योजनेंतर्गत 4.5 लाख रुपयेपर्यंत व्याज परतावा करण्यात येतो. व्याज ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Image
मुंबई, दि.3 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा मंत्री श्री.विखे पाटील यांनी घेतला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शितलकुमार मुकणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी  विखे पाटील म्हणाले, महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरणासाठी निधी देण्यात आला आहे. महामंडळाचे भाग भांडवल वाढविण्याबाबत ही निर्णय घेण्यात येईल. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा आढावा घेण्यात आला. महामंडळाच्या माध्यमातून शेळी समुह योजना प्रभावीपणे राबवाव...

विविध ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे महसूल गुप्तचर विभागाने केले उघड

Image
नवी दिल्ली :- संपूर्ण भारतभरात टाकलेल्या धाडसत्रात सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) उघड केले आहे. या कारवाईत 13/14.10.2023 रोजी 31.7 किलो सोने जप्त करण्यात आले. जमीन/रेल्वे मार्गाने सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच टोळ्यांचा भाग असलेल्या दुसर्‍या शाखेचेही बिंग विभागाने फोडले. बसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन व्यक्तींना डीआरआय मुंबईच्या पथकाने पुण्याजवळ पकडले. त्यांच्याकडून 30.10.2023 रोजी रात्री उशिरा 5 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील एका गावातील एका हँडलरची माहिती समोर आली. वेगाने कारवाई करत, 31.10.2023 रोजी सकाळी डीआरआय अधिकार्‍यांनी त्याच्या घराची झडती घेतली. यातून त्याच टोळीचे आणखी दोन हँडलर वाराणसीहून नागपूरला सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, ही माहिती वाराणसीच्या डीआरआयला देण्यात आली. त्यांनी तातडीने पावले उचलली आणि 31.10.2023 रोजी आणखी 8.7 किलो तस्करीचे सोने जप्त करत दोन हँडलरना अटक केली. मुंबई, गोवा प्रादेशिक विभाग ...

न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाऊले टाकणे सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; आंदोलने मागे घेण्याचे देखील कळकळीचे आवाहन मुंबई दि. २ : मनोज जरांगे पाटील यांनी आज उपाेषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदेतज्ज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिला घटना असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दोन महिन्यांची मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊले टाकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. येणारी दिवाळी तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे गोष्टी लक्षात घेऊन मी सर्व आंदोलकांना आवाहन करतो की त्यांनी आपली आंदोलने देखील आता मागे घ्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दोन महिन्यात राज्यभरातल्या कुणबी नोंदी तपासून मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद ग...

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

Image
मुंबई ,  दि. 02 :  देशभर 30 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.  राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना ,  भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,  मुंबई विभाग ,  91 ,  सर पोचखानवाला मार्ग ,  वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064 ,  दूरध्वनी क्रमांक 022-24921212 ,  संकेतस्थळ  acbmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर अथवा ईमेल  acbwebmail@mahapolice.gov.in ,  addlcpacbmumbai@mahapolice.in ,  फेसबुक  www.facebook.com-maharashtra- ACB,  मोबाईल ॲप  acbmaharashtra.net ,  एक्स (ट्विटर) –  @ACB_Maharashtra  आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा ,  असे आवाहन ल...