भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन


मुंबईदि. 02 : देशभर 30 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. 

राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतानाभ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागमुंबई विभाग91सर पोचखानवाला मार्गवरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064दूरध्वनी क्रमांक 022-24921212संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ईमेल acbwebmail@mahapolice.gov.inaddlcpacbmumbai@mahapolice.inफेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, एक्स (ट्विटर) – @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी केले आहे.

https://ekaro.in/7v4plm9


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन