कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सिटी लिंकचे नियोजन

नाशिक :-  (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिककर भाविकांना श्री शिवमहापूराण कथेचा लाभ घेता यावा करीता सिटीलिंकच्या वतीने जादा बसफेर्‍यांचे नियोजन

आंतरराष्ट्रीय कथाकार पं. प्रदीप मिश्रा ( सिहोरवाले ) यांच्या श्री शिवमहापूराण कथेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. दिनांक २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पाथर्डी गाव परिसरात हा सोहळा होणार आहे. या पाच दिवसांच्या सोहळ्याकरिता लाखो भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज असून त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. 
 भाविकांना या कथा सोहळ्याचा आनंद घेता यावा याकरिता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि अर्थातच सिटीलिंकच्या वतीने देखील ज्यादा बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहता यावे याकरिता सिटीलिंकच्या वतीने सकाळी ११ ते कार्यक्रम संपेपर्यंत या कालावधीत निमाणी येथून दर १० मिनिटांना तर नाशिकरोड येथून दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खालील मार्गावरील बसेस या सोहळ्याकरिता उपलब्ध असतील.

१) मार्ग क्रमांक १०३ – निमाणी ते सिंबोईसीस व सिंबोईसीस ते निमाणी ( कार्यक्रम स्थळापर्यंत )
२) मार्ग क्रमांक १०४ – निमाणी ते पाथर्डी गाव व पाथर्डी गाव ते निमाणी ( कार्यक्रम स्थळापर्यंत )
३) मार्ग क्रमांक १०६ – निमाणी ते अमृतानगर व अमृतानगर ते निमाणी ( कार्यक्रम स्थळापर्यंत )
४) मार्ग क्रमांक १०७ – निमाणी ते अंबडगाव व अंबडगाव ते निमाणी ( पाथर्डीफाटा पर्यंत )
५) मार्ग क्रमांक २०४ – नाशिकरोड ते पाथर्डी गाव व पाथर्डी गाव ते नाशिकरोड ( कार्यक्रम स्थळापर्यंत )
६) मार्ग क्रमांक २०७ – नाशिकरोड ते अंबडगाव व अंबडगाव ते नाशिकरोड ( पाथर्डीफाटा पर्यंत )

 दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर या ५ दिवसांकरिता वरील जादा बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बस फेर्‍यांचा लाभ घ्यावा. तसेच बसफेर्‍यांसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास कृपया ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन