येवला येथे संविधान दिन उत्साहात साजरा
येवला :- विंचुरचौफुलीवरील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्मारका जवळ पक्षाचे नेते महेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व जाती धर्माच्या धर्म गुरूच्या उपस्थितीत संविधान गौरव दिन उत्साहात साजरा. याप्रसंगी विंचुर चौफुली येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन महेंद्र पगारे यांनी केले.तसेच पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यानी पुष्पहार अर्पण केला.यावेळी प्रा वैभव सोनवणे, यांनी संविधानाच्या प्रास्ताविक चे वाचन करून प्रतिज्ञा दिली.
यावेळी बौध्द भत्ते उपाली, ख्रिश्चन धर्माचे मोरे गुरूजी, हिंन्दु धर्माच्या ब्रम्हकुमारी निता दिदी, अणु दिदी, जंगलीदास आश्रमाचे प्रमुख कंकाली महाराज, मुस्लिम धर्माचे अजीज शेख, शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, ग्रामीण पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, डाॅ.भुषण शिनकर शाहुराजे शिंदे, यांनी संविधान पर भाषणे केली.
यावेळी महेंद्र पगारे आपल्या भाषणात म्हणाले की ह्या देशात अनेक जाती धर्म वर्ण पंथ विविध भाषिक लोक केवळ भारतीय संविधानामुळे सुरक्षित आहे. परंतु लोकशाही सरकार असुनही देशात मणिपुर सारख्या घटना घडत आहेत. दहशतवादी हल्ले होतात सध्या देशात,राज्यात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य अनेक जण करत आहे.त्यासाठी संविधानाची काटेकोर पणे अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे.मला गर्व वाटतो येवला शहर व तालुक्याचा की इथे सर्व जण एकत्र येऊन दरवर्षीच संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करून महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते.सर्वांनी संविधान दिन साजरा करावा असे आवाहन पगारे यानी यावेळी केले.
याप्रसंगी पक्षाच्या वतीने सर्व धर्म गुरूचा सत्कार व संविधान प्रत व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 26/11/2008 रोजी मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी महेंद्र पगारे, महेश काळे, सचिन आहेर, विजय घोडेराव, बाळासाहेब, अहिरे, विनोद त्रिभुवन, अँड.अनिल झाल्टे, समाधान पगारे, बाळासाहेब सोनवणे, सुरेश खळे, डाॅ.केदारे, अतुल धिवर, गौतम पगारे, सुरेश सोनवने, वैभव सोनवणे, अजित पवार, दिपक शिरूड, युवराज पगारे, राम कोळगे, शेरूभाई मोबीन, अजहर शहा, सौ.आशा आहेर, सरिता शिरूड, नयना सोनवणे, ज्योती पगारे, अलका घोडेराव, उषाबाई पगारे, पार्बताबाई पगारे, सुजाता पगारे, अनमोल आहेर, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment