दिपावली सुट्टीनिमित्त सिटीलिंक पास केंद्राच्या वेळेत बदल

नाशिक :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. परिणामी शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्ट्या लागल्या आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने सध्यस्थितीत पास काढणार्‍या प्र्वाश्यांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे सण-उत्सव कालावधीकरिता पास केंद्राच्या वेळेत अंशतः बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेतच पास केंद्र सुरू राहतील मुख्य म्हणजे हा वेळेतील बदल केवळ दिनांक ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीकरीताच करण्यात आला आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ज्या ही प्रवाशांना पास काढावयाचा असेल अशा प्रवाशांनी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेतच काढून घ्यावा.
 सद्यस्थितीत सिटीलिंक मुख्यालय, निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक या तीन ठिकाणी पास केंद्र सुरू असून या सर्व ठिकाणी हा निर्णय लागू असेल. तसेच दिनांक १९ नोव्हेंबर पासून पास केंद्र पूर्ववत सुरू राहातील याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी