आम आदमी पार्टीचा मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा

नाशिक :- मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यांनी स्वतःला सावरावे, कारण "जान है, तो जहान है" असे आप च्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले नाना बच्छाव यांच्यामार्फत जरांगे पाटील यांना सांगण्यात आले आहे. मराठा समाज तुमचा आभार मानून तुमच्या आंदोलनाची किंमत करणार नाही, परंतु तुमची झालेली दुरावस्था बघून जनतेत रिक्षा सरकार विरुद्ध मोठा रोष निर्माण झाला आहे, सरकारला राजकारण करून आपले ईशिप्त साध्य करायचे आहे का? असाही प्रश्न आप कडून विचारण्यात आला आहे, जरांगे यांना जवळपास 5 कोटी मराठ्यांचे समर्थन आहे असेही सांगण्यात आले.

प्रतिक्रिया - गोपाल ईटालिया 
(सहप्रभारी, महाराष्ट्र) :- महाराष्ट्र सरकारने कृपया वेळकाढूपणा सोडून मराठ्यांना कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण द्यावे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना 40 दिवसात आरक्षण देतो हे कोणत्या निष्कर्षावर सांगितले होते आणि आता चाळीस दिवस उलटल्यानंतर आरक्षण दिलेले नाही, ही फसवणूक का केली असा प्रश्न मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करीत आहेत त्यांनी याबाबत कडक पावले उचलावीत. 

प्रतिक्रिया - नविंदर अहलुवालिया
(राज्य संघटन मंत्री):- मराठा आरक्षण हे मराठा समाज आपल्या मुलांचा भविष्यासाठी मागत आहे. आज महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे. सरकारी आरोग्य व्यवस्था, सरकारी शाळा संपूर्ण कोलमडून गेलेल्या आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आरक्षणाची गरज मराठा समाजाला तीव्रपणे जाणवत आहे. यावर सरकारने ईतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

प्रतिक्रिया - चंदन पवार 
(राज्य मिडिया प्रमूख):- मराठा समाजाला याआधीही कुणबी प्रमाणपत्र मिळतच होते आणि आता पुन्हा सरकारने तेच सांगून नवीन काय केलेलं आहे? परंतु ज्याच्याकडे कुणबी नोंद नसेल त्या आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय परिवाराने काय केले पाहिजे, हे ही सरकारने सांगावे, "सरकार हे जनतेसाठी असते जनता सरकारसाठी नाही"  हेच आजचे सरकार विसरले आहे, हा संघर्ष महाराष्ट्रात अधिक व्यापक होऊ नये याची काळजी आता सरकारने घ्यायची आहे.

काल मनोज जरांगे पाटील यांना आम आदमी पार्टी, महाराष्ट्रकडून पाठिंब्याचे पत्र सकल मराठा समाज्याचे उपोषणकर्ते नाना बच्छाव यांच्यामार्फत देण्यात आले, महाराष्ट्रात आम आदमी पार्टी ही अशी पहिली राजकीय पार्टी आहे ज्यांनी पाठिंबाचे पत्र अंतरवली येथे जाऊन 5 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांना सर्वात आधी दिलेले आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मिडिया प्रमुख चंदन पवार, देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीश उगले पाटील, पुर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, पदाधिकारी स्वप्निल घिया, चंद्रशेखर महानुभव ,संतोष राऊत, प्रदीप लोखंडे, अभिजीत गोसावी, प्रमोदिनी चव्हाण, बाळासाहेब बोडके, माजीद पठाण, गोरख मोहिते, नितीन डांगे पाटील, अल्ताफ शेख, दीपक सरोदे, नूतन कोरडे, अमर गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन