नवीन ऑन्कोलॉजी युनिट आणि रेडिओलॉजी उपकरणे, रुग्णासाठी वरदान - मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे

नाशिक :- आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि मविप्र रुग्णालय आणि संशोधन केंद्रात कर्करोग निदान आणि उपचार कक्ष कार्यान्वित झाला असून त्यामुळे नाशिक शहर , जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे , जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा लाभ होणार .
या कर्करोग निदान व उपचार कक्षात कॅन्सर सर्जन डॉ- सुलभ भामरे आणि कॅन्सर फिजिशियन डॉ- शैलेश बोंदार्डे हे रुग्णांना सेवा देणार आहेत. मविप्र रुग्णालयात नवीन डिजिटल एक्स-रे, डीआर सिस्टम आणि डिजिटल एक्स-रे स्कॅनोग्राम या अद्ययावत मशीन उपकरणाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.

नवीन ऑन्कोलॉजी युनिट आणि नवीन रेडिओलॉजी उपकरणे हे सर्वसामान्य रुग्ण आणि  मविप्र सभासदांसाठी वरदान ठरतील. तसेच नवीन कर्करोग निदान व उपचार कक्ष जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा देणारे असून अद्ययावत उपचार प्रदान करण्यासाठी मविप्र व्यवस्थापनाने उचलेले हे महत्वपूर्ण पाऊल.

यावेळी मविप्र, सरचिटणीस अँड नितीन ठाकरे शिक्षणाधिकारी डॉ- ज्ञानेश्वर लोखंडे , अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे , उप वैद्यकीय अधीक्षक डॉ- कल्पना देवणे ,  सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ- कैलास मोगल, रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ- निलेश चौधरी , ऑन्को सर्जन डॉ सुलभ भामरे, ऑन्को फिजिशियन डॉ शैलेश बोंदार्डे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन