मनपाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा, विविध योजनांची माहिती

नाशिक :- नाशिक महानगरपालिका नाशिक,विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्रशासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना आयुष्यमान भारत योजना, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, भारतीय जन औषधी योजना, अटल पेन्शन योजना, आत्मनिर्भर भारताच्या विकासाचे दृष्टीने नव्या युगाची सुरुवात अशा विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व शिबिराचे आयोजन नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून दिनांक २८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान शहरातील विविध ६० ठिकाणी या यात्रेद्वारे आयोजन करण्यात आलेले आहे. विभागीय कार्यालय नाशिक पूर्व विभागातर्फे दिनांक २९.११.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा या माध्यमातून विविध योजना बाबत नागरिकांना व लाभार्थ्यांना माहिती देणे कामे कार्यक्रमाचा शुभारंभ उपायुक्त गोदावरी संवर्धन डॉ.विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विभागीय अधिकारी नाशिक पूर्व राजाराम जाधव,विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी नाशिक पूर्व डॉ.गणेश गरुड , जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद , अधीक्षक चंदन घुगे तसेच विभागीय कार्यालय नाशिक पूर्व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शहरी अभियान व्यवस्थापक पल्लवी वक्ते , रंजना शिंदे, संतोष निकम, संदीप भोसले तसेच समूह संघटक संदीप कोटेकर, त्याचप्रमाणे कर्मचारी व नागरिक यांच्या सर्वसाधारण रुग्ण तपासणी करिता नाशिक मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.राजश्री पाटील ,डॉ. प्रसाद गोसावी, डॉ. नितीन वर्गीस ,डॉ. आशना शेख त्याचप्रमाणे आशासेविका उपस्थित होत्या. आयुष्यमान भारत कार्ड बाबतची माहिती देणे करिता तसेच त्याबाबतची नोंदणी करणे करिता वैशाली सावंत, पायल कडाळे, सरला पोटकुळे तसेच माननीय शासनाच्या उज्वला योजना बाबतची माहिती देणे करिता रेखा दशपुते व सुभाष विष्णोई इत्यादी अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी व नाशिक पूर्व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.यात्रेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना धनादेश,परिचय कार्ड, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे यांनी केले तर विकसित भारत संकल्पाची शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी उपस्थितांना दिली.
दिनांक ३० रोजी सकाळी ११ वाजता नवीन नाशिक विभागीय कार्यालय,दुपारी ३ वाजता सातपूर विभागीय कार्यालय येथे विकसित भारत संकल्प यात्रा येणार असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन